‘इत्तेफाक’ शॉर्ट पण स्वीट -सिद्धार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2016 06:47 PM2016-11-22T18:47:19+5:302016-11-22T18:47:19+5:30
बॉलिवूडचा सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री नंदा यांच्या मुख्य भूमिकेतील ‘इत्तेफाक’ चित्रपट आठवतोय का? मर्डर मिस्ट्री असलेल्या चित्रपटाने त्यावेळी ...
ब लिवूडचा सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री नंदा यांच्या मुख्य भूमिकेतील ‘इत्तेफाक’ चित्रपट आठवतोय का? मर्डर मिस्ट्री असलेल्या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स आॅफीसवर प्रचंड कमाई केली. आता तुम्हाला असं कळालं की, याच चित्रपटाचा रिमेक येतोय तर? सिद्धार्थ मल्होत्रा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिकेत हा चित्रपट साकारण्यात येईल. चित्रपटाबद्दल सिद्धार्थ खुप उत्सुक असून त्यासाठी विशेष मेहनत घेताना तो दिसतोय.
जुन्या चित्रपटाच्या कथानकापेक्षा याचे कथानक वेगळे असणार याविषयी बोलताना तो म्हणतो,‘कथानक वेगळे असणार आहे. प्लॉट एकच असून एका रात्रीची ती गोष्ट आहे. चित्रपटात कुठलेही मजेशीर सीन्स नसतील प्रत्येक भूमिक ांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. एक अॅक्शन थ्रिलरपट चित्रपट असेल. चित्रपट ‘शॉट पण स्वीट’ असेल. चित्रपट पाहताना प्रेक्षकांना कुठेही बोअर होणार नाही. पूर्णपणे थ्रिल अनुभवता येण्याची शाश्वती दिग्दर्शकांनी दिली आहे.’
२०१७ मध्ये आगामी ‘इत्तेफाक’ चित्रपट रिलीज होईल. यश चोप्रा यांचा १९६९ चा ‘इत्तेफाक’ चित्रपट मुळात ब्रिटिश चित्रपट ‘सिंगपोस्ट टू मर्डर’ चा रिमेक आहे. या चित्रपटाचे विशेष हे आहे की, रेड चिलीज एंटरटेनमेंट, धर्मा प्रोडक्शन्स आणि बीआर फिल्मस हे बॅनर चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. पाहूयात, एवढ्या मोठ्या बॅनरखालील चित्रपट कितपत प्रेक्षकांना आवडतोय ते...