युलिया वंतुरने अखेर सोडले मौन, सांगितले कधी करणार सलमान खानसोबत लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:07 PM2020-05-11T14:07:14+5:302020-05-11T14:10:28+5:30
युलियाला नुकतेच सलमानसोबत कधी लग्न करणार याबाबत विचारण्यात आले. नेहमीच या प्रश्नाचे उत्तर टाळणाऱ्या युलियाने पहिल्यांदाच त्यांच्या लग्नाविषयी मीडियाला सांगितले.
युलिया वंतुर ही मुळची रोमानियाची असून ती लवकरच राधा क्यो गोरी मै क्यो काला या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण युलिया गेल्या काही वर्षांपासून एका वेगळ्याच कारणामुळे प्रकाशझोतात आहे. सलमानच्या जवळच्या व्यक्तींमध्येदेखील तिचा गेल्या अनेक वर्षांपासून समावेश होतो. तिला अनेकवेळा सलमानसोबत पाहायलला मिळते. युलियासोबत सलमान रिलेशनशीपमध्ये असल्याचे देखील म्हटले जाते. पण त्या दोघांनीही यावर मौन राखणेच पसंत केले आहे. युलिया सलमान खानसाठी कुटुंबातील एका व्यक्तीप्रमाणेच असून कौटुंबिक सोहळे, सणांना ती सलमानच्या कुटुंबियांसोबत आवर्जून पाहायला मिळते.
सलमान आणि युलिया लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात होते. सलमान लग्न कधी करणार हा प्रश्न त्याला नेहमीच अनेक मुलाखतींमध्ये विचारला जातो. पण नेहमीच तो या प्रश्नाचे उत्तर देणे टाळतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत युलियाने सलमान खानसोबत लग्न करण्याबाबत तिचा काय विचार आहे याचे उत्तर दिले आहे.
युलियाला नुकतेच सलमानसोबत कधी लग्न करणार याबाबत विचारण्यात आले. त्यावर तिने उत्तर दिले की, लग्न करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत आनंदित आहात की नाही हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. लग्न करण्याबाबत मला नेहमीच विचारले जाते. पण तुम्ही एकमेकांसोबत लग्न न करता आनंदित असाल तर तुम्हाला एकत्र राहाण्याचा नक्कीच अधिकार आहे आणि माझ्या लग्नाबाबत पूर्वी माझे आई-वडील देखील मला नेहमीच विचारायचे. पण मी एकदा त्यांना कंटाळून म्हटले की, तुमच्यासाठी मी लग्न करणे अधिक महत्त्वाचे आहे की आनंदी राहाणे... हे तुम्हीच मला सांगा...
युलियाच्या या उत्तरामधून तिचा आणि सलमानचा सध्या ती लग्नाचा काहीही विचार नाहीये असेच दिसून येत आहे. पण असे असले तरी ते दोघे क्वॉलिटी टाईम एकमेकांसोबत घालवताना दिसत आहे. सध्या देखील लॉकडाऊनमध्ये युलिया आणि सलमानसोबत त्याच्या काही मित्रमैत्रिणींसोबत पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसवर आहे.