यूलिया वंतूर आता करणार अ‍ॅक्टिंग! कृष्णाच्या भक्तीत होणार लीन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:40 PM2018-08-22T14:40:33+5:302018-08-22T14:42:03+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खान याची कथित गर्लफ्रेन्ड युलिया वंतूरची गाणी आपण ऐकलीतं. आता वेळ आहे, ती तिच्यातील अ‍ॅक्टिंग टॅलेंट अनुभवण्याची. 

Iulia Vantur to play a Krishna Bhakt in her debut film | यूलिया वंतूर आता करणार अ‍ॅक्टिंग! कृष्णाच्या भक्तीत होणार लीन!!

यूलिया वंतूर आता करणार अ‍ॅक्टिंग! कृष्णाच्या भक्तीत होणार लीन!!

googlenewsNext

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खान याची कथित गर्लफ्रेन्ड युलिया वंतूरची गाणी आपण ऐकलीतं. आता वेळ आहे, ती तिच्यातील अ‍ॅक्टिंग टॅलेंट अनुभवण्याची. होय, सलमानची ही कथित गर्लफ्रेन्ड लवकरचं बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ताजी खबर खरी मानाल तर, प्रेम सोनीच्या आगामी चित्रपटात युलियाची वर्णी लागली आहे. या डेब्यू चित्रपटात ती पोलंडच्या एका तरूणीची भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. पोलंडची ही मुलगी भारतात येते आणि भारताच्या प्रेमात पडले. येथे ती कृष्णाच्या भक्तीत अशी काही रमते की, इथलीच बनून राहते, असे याचे कथानक आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही़. या चित्रपटात जिमी शेरगिल एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचेही कळतेय.
चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी हिंदी बोलता येणाऱ्या एका विदेशी चेह-याचा शोध होता. युलिया या भूमिकेत अगदी फिट बसणारी होती. अलीकडे प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘रेस3’मधून युलियाने सिंगींग डेब्यू केला होता. आपल्या डेब्यू चित्रपटासाठीही युलिया गाणार आहे.
लवकरच या चित्रपटाची घोषणा होण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये ‘ओ तेरी’ या चित्रपटात युलिया कॅमिओ रोलमध्ये दिसली होती. पण प्रेम सोनीचा हा आगामी चित्रपट युलियाचा पहिला सोलो डेब्यू चित्रपट असणार आहे.
प्रेम सोनीने २००९ मध्ये सलमान, करिना कपूर आणि सोहेल खानसोबत ‘मैं और मिसेस खन्ना’ दिग्दर्शित केला होता. यानंतर २०१३ मध्ये प्रीति झिंटा स्टारर ‘इश्क इन पॅरिस’चे दिग्दर्शनही केले होते. अर्थात या दोन्ही चित्रपटांना फार यश मिळाले नव्हते. आता प्रेम सोनीचा युलिया वंतूरसोबतचा नवा चित्रपट किती यशस्वी ठरतो, ते बघूच.

Web Title: Iulia Vantur to play a Krishna Bhakt in her debut film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.