'मी दीर्घकाळापासून लठ्ठपणाचा सामना करत आलोय', अर्जुन कपूरचा खडतर व भावूक उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 05:40 PM2021-07-22T17:40:35+5:302021-07-22T17:41:07+5:30
'संदीप और पिंकी फरार' चित्रपटला भव्य यश मिळाल्यानंतर अभिनेता अर्जून कपूरचे करिअर प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
'संदीप और पिंकी फरार' चित्रपटला भव्य यश मिळाल्यानंतर अभिनेता अर्जून कपूरचे करिअर प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अर्जुनने त्याचे वजन बरेच कमी केले आहे आणि या बाबीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो म्हणाला की, त्याला अखेर काही वर्षांनंतर आनंदी वाटत आहे. त्याने लठ्ठपणाचा सामना करण्यासोबत शरीरयष्टीला उत्तम आकार देण्यापर्यंतचा भावूक प्रवास सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अर्जुन म्हणाला, ''मला खूपच आनंद झाला आहे आणि ही अत्यंत खास भावना आहे, कारण काही वर्षांपासून मला हा उत्साह जाणवत आला आहे. मी चित्रपट 'संदीप और पिंकी फरार'मधील माझ्या अभिनयाचे कौतुक करणारे प्रेक्षक व समीक्षकांचे आभार मानतो. या चित्रपटाचे यश माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप आहे आणि यामुळे एक अभिनेता म्हणून माझ्या भावी आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. मी उत्तम शरीरयष्टी संपादित करण्यामध्ये यशस्वी झालो आहे आणि हे घडण्याचे श्रेय माझ्या दृढ इच्छाशक्तीला जाते.''
अर्जुन म्हणाला की, त्याला बालपणापासून लठ्ठपणाचा सामना करावा लागल्यामुळे सकारात्मक विचार करण्यासाठी त्याचे मन वळवण्यासाठी खूप खडतर काळाचा संघर्ष करावा लागला आहे. इंटरनेट हे जितके उपयुक्त तितकेच घातक देखील आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो याबाबत नसलेली जाणीव ही आजची मोठी समस्या बनली आहे.
तो म्हणाला, ''माझ्या अनारोग्य स्थितीमुळे मला विशिष्ट शरीरयष्टी राखण्यामध्ये नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. अनेकांना माहित नाही की मी दीर्घकाळापासून लठ्ठपणाचा सामना करत आलो आहे. मी लठ्ठ असण्यासोबत ती मोठी समस्या होती. हा प्रवास सुलभ राहिलेला नाही. माझ्या शरीरयष्टीसाठी माझ्यावर अनेक टिका करण्यात आल्या आहेत. पण मी त्या स्वीकारत मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण प्रेक्षकांना कलाकार सुदृढ शरीरयष्टीमध्येच पाहायला आवडतात. मला ते माहित आहे. मी ज्या संघर्षामधून गेलो ते त्यांना माहित नाही. तरीदेखील ते ठीक आहे. मला स्वत:ला आणि माझ्यावर विश्वास असलेल्या प्रेक्षकांना माझ्या क्षमता सिद्ध करून दाखवयाच्या आहेत.''
अर्जुन पुढे म्हणाला, ''माझी स्थिती जलद निकाल संपादित करण्यासाठी काहीशी वेगळी आहे. लोक एका महिन्यामध्ये बदल संपादित करू शकतात, पण मला असे करण्यासाठी २ महिने लागले. मी सध्याची शरीरयष्टी संपादित करण्यासाठी वर्षभर स्वत:कडे लक्ष दिले आहे. माझी फक्त तंदुरूस्त व सर्वोत्तम होण्याची इच्छा आहे. या प्रवासाने मला प्रोत्साहित केले आहे आणि दाखवून दिले आहे की, अशक्य असे काहीच नाही. स्थिती काही असो मला फक्त ध्येयाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. दुर्दैवाने टीका करणे हा आपल्या संस्कृतीचा भाग बनला आहे आणि मी फक्त आशा करू शकतो की, आपण समाज म्हणून सर्वोत्तम होऊ. होच, मला अजूनही आशा आहे.''
अर्जुन म्हणाला की, इच्छेमधून प्रेरणा मिळते. सर्व कलाकारांवर त्यांच्या क्षमता सिद्ध करण्याचा दबाव आहे. ते प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरण्यासोबत त्यांच्या टीकेचा देखील सामना करतात. त्यांचे जीवन विच्छेदित असण्यासोबत सर्वजण त्यांचे परीक्षण करतात. हे प्रोफेशन सोपे नाही.
अर्जुन म्हणाला, ''इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी कायम ठेवण्याचा आणि मनात नकारात्मकता न आणण्याचा मोठा दबाव असतो. माझ्या चित्रपटांना अपेक्षित यश मिळत नसताना माझा दृष्टिकोन नकारात्मक झाला होता. प्रथम मला माझ्या आरोग्याबाबत असलेली समस्या समजली आणि मी प्रत्येक दिवस मेहनत घेत पुढे जाण्याचा अथक प्रयत्न केला.''
तो पुढे म्हणाला, ''तुमच्यावर कामाचा सतत दबाव असेल तर तुम्ही कोणत्या टप्प्यामधून जात हे तुम्हाला समजत नाही. तुम्ही चेहऱ्यावर आनंद दाखवताना आतून खचून जात आहात, हे देखील समजत नाही. असे माझ्या बाबतीत घडले आणि अनेक लोकांच्या बाबतीत देखील घडते.''
प्रेक्षकांच्या मते चित्रपट 'संदीप और पिंकी फरार'मध्ये उत्तम अभिनय सादर केल्यानंतर ही अर्जुन २.० वेळ आली आहे. तो म्हणाला की, कलाकारांना मिळणाऱ्या प्रशंसेमधून निश्चितच प्रेरणा मिळते आणि आतून बरे वाटण्यामध्ये मदत होते.मी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. माझ्या मते, सर्वांनाच आनंद झाला आहे. मी कमी केलेले वजन आणि माझा उत्तम लुक प्रेक्षकांना आवडत असेल तर मी त्यांच्या प्रोत्साहनासाठी त्यांचे आभार मानतो. सकारात्मकता व नकारात्मकता हे आपल्या कामाचे भाग आहेत. कलाकार म्हणून आम्ही ते स्वीकारत पुढे गेलो पाहिजे.''
तो पुढे म्हणाला, ''महामारीदरम्यान मी सकारात्मक राहणीमानाबाबत विविध गोष्टी वाचण्यास सुरूवात केली. त्यामुळे अनेक गोष्टींचे निराकरण करण्यामध्ये मदत झाली. मी नेहमीच स्वत:वर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित लॉकडाऊनमुळे मला स्वत:वर लक्ष केंद्रित करण्यास आणि या क्षेत्रामध्ये केल्या जाणाऱ्या टिकेकडे दुर्लक्ष करण्यास मदत झाली असावी.''
अलिकडील काळात अर्जुनसाठी सुगीचे दिवस असल्यासारखे वाटतात. तो ब्लॉकबस्टर चित्रपट 'एक विलन २'मध्ये दिसणार आहे. त्याला वाटते की, हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांमध्ये घेऊन येईल. तो म्हणाला की, त्याला दिग्दर्शक मोहित सुरी यांना अपेक्षित असलेली उत्तम शरीरयष्टी संपादित करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक अथक मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यांची इच्छा आहे की, अर्जुनने स्वत:मध्ये मोठा बदल करावा.
तो म्हणाला, ''मी आशा करतो की, चित्रपट 'एक विलन २'मध्ये मला पाहिल्यानंतर प्रेक्षक अचंबित होतील. मोहित सुरी यांनी मला पडद्यावर झळकणाऱ्या अभिनयाबाबत कल्पना दिली आहे आणि मी तो प्रबळ, मनोरंजनपूर्ण अभिनय सादर करण्याच्या खात्रीसाठी अथक मेहनत घेत आहे.''
अर्जुन संघर्षमय काळामध्ये त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याचे कुटुंबिय व चाहत्यांचे आभार मानतो. तो म्हणाला, ''मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, मला खंबीर आधार देणारे लोक असल्याने मी खूप नशीबवान आहे आणि त्यासाठी मी त्यांचा कृतज्ञ आहे. त्यांनी मला प्रेमळ भावना दिली आहे आणि मला स्पेशल बनवले आहे. ज्यामधून मला माझ्या जीवनात पुढे जाण्यास प्रेरणा मिळाली आहे. मी आज ज्या यशावर पोहोचलो आहे त्यासाठी मी पात्र असल्याचा विश्वास त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केला. माझ्या जीवनाच्या या टप्प्यादरम्यान सकारात्मक उत्साह निर्माण करणारे माझे चाहते व प्रेक्षकांचे मी आभार मानतो. यामुळे मला स्वत:वर व माझ्या जीवनावर लक्ष केंद्रित करता आले.''