जबरिया जोडीचा फर्स्ट लूक रिलीज, परिणीती आणि सिद्धार्थ दिसणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 10:53 AM2018-08-21T10:53:13+5:302018-08-21T11:12:15+5:30
अनेक दिवसांनंतर परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र दिसणार आहेत. 'जबरिया जोडी'मध्ये परिणीती आणि सिद्धार्थ एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.
अनेक दिवसांनंतर परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र दिसणार आहेत. 'जबरिया जोडी'मध्ये परिणीती आणि सिद्धार्थ एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमाची शूटिंग लखनऊमध्ये सुरु आहे. मेकर्सनी सिनेमाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Yeh jodi zabardast bhi hai aur jabariya bhi! Presenting the first look of #JabariyaJodi.@S1dharthM@ParineetiChopra@balajimotionpic@RuchikaaKapoor@ShaileshRSingh@KarmaMediaEnt@writerrajpic.twitter.com/szkxKFqBN3
— Ekta Kapoor (@ektaravikapoor) August 20, 2018
आधी या सिनेमाचे नाव शॉटगन शादी असे ठेवण्यात येणार होते मात्र नंतर काही तरी बदल झाल्याने सिनेमाचे नाव जबरिया जोडी ठेवण्यात आले. फर्स्ट लूकमध्ये सिनेमाची थीम स्पष्ट होतेय. हा सिनेमा बिहारमध्ये सध्या चालत असलेल्या बळजबरी विवाह करून देण्याच्या म्हणजेच 'पकडूआ शादी' ह्या प्रथेवर आधारित आहे. ह्या सिनेमासाठी एकताने सिद्धार्थला बॉडी बनवण्याचा सल्ला दिला आहे. या भूमिकेसाठी परिणीतीच्या आधी श्रद्धा कपूरला अप्रोच करण्यात आले होते. मात्र तिने नकार दिला.
Here are Abhay n Babli an anokhi and desi jodi! Presenting #JabariyaJodi.@ParineetiChopra@ektaravikapoor@balajimotionpic@RuchikaaKapoor@ShaileshRSingh@writerrajpic.twitter.com/frrduUtPYs
— Sidharth Malhotra (@S1dharthM) August 20, 2018
'जबरिया जोडी'शिवाय सिद्धार्थ 'द मेजर विक्रम बत्रा' यांच्या जीवनावर आधारीत सिनेमातसुद्धा दिसणार आहे. बत्रा यांची भूमिका वठविणे म्हणजे एक मोठे आव्हान असल्याचे बोलला होता. सिद्धार्थ मल्होत्रा मेजर विक्रम बत्रा यांची भूमिका वास्तविक वाटण्यासाठी खूप मेहनत घेतो आहे. तसेच या भूमिकेबाबत त्याच्या मनावर खूप दडपणदेखील आहे. त्याला या वेगळ्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. तर परिणीती चोप्रा अर्जुन कपूरसोबत नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी असून या चित्रपटाची कथा दोन प्रेमीयुगुलांभोवती फिरते.‘नमस्ते इंग्लंड’ची धूरा सांभाळणाऱ्या विपुल शाह यांनी यापूर्वी 'नमस्ते लंडन' या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते.