Jackie Shroff : बसमधील १३ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडला 'भिडू', तिलाच बनवले लाईफ पार्टनर; जॅकी दादाची अनोखी लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 12:27 PM2023-02-14T12:27:40+5:302023-02-14T12:28:35+5:30

बॉलिवूडचा 'हिरो' जॅकी दादा म्हणडेच जॅकी श्रॉफची लव्हस्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे.

jackie shroff and wife ayesha shroff interesting love story | Jackie Shroff : बसमधील १३ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडला 'भिडू', तिलाच बनवले लाईफ पार्टनर; जॅकी दादाची अनोखी लव्हस्टोरी

Jackie Shroff : बसमधील १३ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडला 'भिडू', तिलाच बनवले लाईफ पार्टनर; जॅकी दादाची अनोखी लव्हस्टोरी

googlenewsNext

Jackie Shroff : बॉलिवूडचा हिरो जॅकी दादा म्हणडेच जॅकी श्रॉफची लव्हस्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे. अपना भिडू अन् टपोरी भाषेत बोलणारा जॅकी दादा एका श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडला. बसमध्ये असलेल्या एका १३ वर्षांच्या मुलीला पाहताच जॅकी क्लीन बोल्ड झाला होता. जॅकी श्रॉफच्या याच लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया.

अपना भिडू जॅकी दादाचं प्रेम म्हणजे लव्ह अॅट फर्स्ट साईट होते. एकदा मुंबईत फेरफटका मारत असताना जॅकी दादाची नजर एका बसमधील १३ वर्षांच्या मुलीकडे गेली.ती स्कूल युनिफॉर्ममध्ये बसमध्ये बसली होती. तो पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता. हिच्याचसोबत लग्न करायचे असंच त्याने ठरवलं.तो लगेच तिच्याजवळ गेला आणि स्वत:ची ओळख सांगितली. आधी नाव सांगितले अन् नंतर मी इथेच खेळायला येतो असेही सांगितले. तिलाही तो पाहताच आवडला होता. ती दुसरी तिसरी कोणी नसून जॅकी दादाची पत्नी आयेशाच आहे. ही बसमधली प्रेमकहाणी पुढे कशी गेली ?

जॅकीसाठी प्रेम मिळवणे इतके सोपे नव्हते, कारण जॅकी दादा तेव्हा मुंबईतील एका चाळीत राहत होता तर आयेशा श्रीमंत कुटुंबातील होती. पण जॅकी दादाच्या नशिबात प्रेम होतेच. म्हणूनच दोघेही पुन्हा एकदा एका रेकॉर्डिंग स्टुडिओत समोरासमोर आले. आयेशा तिथे काही रेकॉर्डिंग खरेदी करण्यासाठी आली होती. जॅकीने तिची मदत केली.आयेशाच्या मनातही जॅकीसाठी भावना जागृत झाल्या होत्या. पण दोघांचेही फॅमिली बॅकग्राऊंड फारच वेगळे होते.  तरी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही सोबत शॉपिंगला जायला लागले, कधी डबल डेकर बसच्या वर जाऊन बसायचे तर कधी मुंबईत लॉंग वॉक करत फिरायचे.

जॅकी दादाची आधीच होती एक गर्लफ्रेंड 

जॅकी आणि आयेशा बराच वेळ एकमेकांसोबत घालवत होते. मात्र जॅकीने एक गोष्ट आयेशापासून लपवून ठेवली होती. ती म्हणजे जॅकीची आधीच एक गर्लफ्रेंड होती. ती अमेरिकेत शिकायला गेली होती. मात्र ती परत आल्यावर दोघांचे लग्न ठरले होते. जॅकीने हे आयेशाला सांगितल्यानंतर तिचे उत्तर ऐकून जॅकीला धक्काच बसला होता. आयेशा म्हणाली, 'मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच नाही करु शकत. मी त्या मुलीसोबत बहिणीसारखी राहीन पण तुला नाही सोडू शकत.' आयेशाचे हे उत्तर ऐकून जॅकी प्रभावित झाला.

आयेशाच्या आईने दिला नकार 

जॅकी आणि आयेशाने एकमेकांबद्दल घरी सांगितल्यानंतर आयेशाच्या आईने मात्र या नात्याला नकार दिला. तरी आयेशाने निर्णय घेतला होता आणि ती त्यावर ठाम होती. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच तिने जॅकीसोबत लग्न केले. एक आलिशान घर सोडून ती जॅकीसोबत चाळीत राहण्यासाठी आली. ५ जून १९८७ पासून हे कपल सोबत आहे. दोघांच्या नात्यात अनेक उतार चढाव आले.मात्र त्यावर मात दोघांनी नात्याला महत्व दिले. 

Web Title: jackie shroff and wife ayesha shroff interesting love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.