लेकीसाठी मुलगा शोधणं कठीण...; जॅकी श्रॉफ असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 02:06 PM2021-07-18T14:06:35+5:302021-07-18T15:23:17+5:30
अलीकडे जॅकी श्रॉफ यांना कृष्णाच्या या रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आलं आणि त्यावर जग्गू दादांनी एकदम हैराण करणारं उत्तर दिलं.
जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांची लाडकी लेक कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) सतत रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. अलीकडे जॅकी श्रॉफ यांना कृष्णाच्या या रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आलं आणि त्यावर जग्गू दादांनी एकदम हैराण करणारं उत्तर दिलं.
मी ज्यांच्या ज्यांना डेट केलं, त्यापैकी एकही जण डॅडला आवडत नव्हता. मी त्यांना ब्लेम करणार नाही. कारण ते अगदी योग्य होते, असं कृष्णा म्हणाली होती. यावर खुद्द तुमचं मत काय? असा प्रश्न एका मुलाखतीत जॅकी यांना विचारण्यात आला. त्यावर मी तिच्या पर्सनल लाईफमध्ये फार ढवळाढवळ करत नाही. पण माझ्या राणीसाठी (लेकीसाठी) मुलगा शोधणं कठीण काम आहे, असं जॅकी म्हणाले.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत जॅकी बोलले. कृष्णाच्या पर्सनल लाईफमध्ये मी फार बोलत नाही. हे तिचं आयुष्य आहे आणि ते कोणासोबत घालवायचं हा तिचा निर्णय आहे. कारण आम्ही आई-बाबा तिला आयुष्यभर पुरणारं नाही. तिला एक उत्तम पार्टनर शोधावा लागेल, जो तिच्यावर प्रेम करेल, तिची काळजी घेईल. पण हो, माझ्या लेकीसाठी असा मुलगा शोधणं खरंच कठीण काम आहे, असं ते म्हणाले.
माझी दोन्ही मुलं कृष्णा व टायगर मनानं एकदम स्वच्छ व पारदर्शक आहेत. मी नशीबवान आहे की, देवानं मला अशी मुलं दिलीत. त्यांच्या मनात कुठलंही कपट नाही. ते खूप मेहनत घेतात, आपल्या अनुभवातून शिकतात, असंही जॅकी म्हणाले.
कृष्णाला पश्चाताप...
होय, बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो शेअर करणे, त्याच्याबद्दल जगाला ओरडून ओरडून सांगणं आपली चूक होती, याचा कृष्णाला पश्चाताप होतोय. अलीकडं एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिनं हे बोलून दाखवलं होतं. ‘ मी रिलेशनशिपमध्ये होती. पण मी हे जगाला सांगण्याची गरज नव्हती. खरं तर मी एकदम प्रामाणिक होती, म्हणून मी या नात्याबद्दल सोशल मीडियावर सांगितलं होतं. पण लोकांना हे नातं स्वीकारताना जड गेलं. लोक सहज स्वीकारत नाहीत. म्हणूनच एक गोष्ट मी प्रामाणिकपणे मान्य करते, ती म्हणजे या नात्याबद्दल लोकांना सांगण्याची गरज नव्हती. मी हे नातं जगासमोर उजागर करून माझी स्वत:ची ओळख गमावून बसली. ब्रेकअपनंतर मी हेच शिकली. जे काही ते मी आहे, माझ्यासाठी आहे आणि माझ्यामुळं आहे. मला स्वत:ची ओळख आहे, हे मला या ब्रेकअपनंतर प्रकषार्नं जाणवलं,’ असं तीम्हणालीहोती.