सलग १७ वेळा लगावली कानशीलात! 'परिंदा'च्या सेटवर जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूरमध्ये नेमकं काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:21 IST2024-12-23T15:20:06+5:302024-12-23T15:21:21+5:30
'परिंदा' सिनेमाच्या सेटवर जॅकी श्रॉफ यांनी अनिल कपूर यांना सलग १७ वेळा कानाखाली का मारली, जाणून घ्या (parinda, anil kapoor, jackie shroff)

सलग १७ वेळा लगावली कानशीलात! 'परिंदा'च्या सेटवर जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूरमध्ये नेमकं काय घडलेलं?
१९८९ साली रिलीज झालेला 'परिंदा' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. या सिनेमात नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, माधुरी दीक्षित या कलाकारांनी भूमिका साकारली होती. 'परिंदा' सिनेमाचं चांगलंच कौतुक झालं. नानांनी साकारलेला खलनायक अन् जॅकी आणि अनिल कपूर यांची केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीस उतरली. पण 'परिंदाच्या सेटवर जॅकी श्रॉफ यांनी अनिल कपूर यांना तब्बल १७ वेळा कानशीलात लगावलेली. नेमकं काय घडलं होतं?
'परिंदा'च्या सेटवर जॅकी - अनिलमध्ये असं काय घडलं?
'परिंदा'च्या सेटवर एका सीनमध्ये जॅकी श्रॉफ यांना अनिल कपूरला कानफडात मारायची होती. त्यासाठी सीन शूट करण्यात आला. जॅकी यांनी सीननुसार अनिल यांना कानफडात लगावली. दिग्दर्शकाने सीन ओके सांगितला. पण अनिल कपूर यांना सीन तितकासा पटला नाही. त्यांना या सीनमध्ये आणखी जीवंतपणा होता. त्यामुळे अनिल यांच्या सांगण्यानुसार जॅकी यांनी पुन्हा टेक दिला. असे १७ टेक झाले. तेव्हा अनिल यांना समाधान वाटलं. त्यामुळे जॅकी यांनी तब्बल १७ वेळा अनिल यांना कानफडात मारली.
अशाप्रकारे 'परिंदा'च्या सेटवर अनिल आणि जॅकी यांच्यात हा मजेशीर किस्सा घडला होता. अनिल आणि जॅकी यांनी आजवर कायमच एकमेकांच्या कामाचं कौतुक केलंय. अनिल आणि जॅकी श्रॉफ यांनी 'परिंदा'शिवाय 'राम लखन', 'त्रिमूर्ती', 'रुप की रानी चोरो का राजा', 'काला बझार', 'अंदर बाहर' या सिनेमांमध्ये अभिनय केलाय. जॅकी श्रॉफ यांचा आगामी सिनेमा 'बेबी जॉन'ची सर्वांना उत्सुकता आहे.