त्याने अचानक सर्वांसमोर पकडले जॅकी श्रॉफचे पाय, पाहा पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 07:49 PM2023-11-23T19:49:48+5:302023-11-23T19:51:31+5:30

नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये चाहत्याचे थेट जग्गू दादाचे पायच पकडले. 

Jackie Shroff Viral Video Fan Touched His Feet And In Return Jackie Shroff Touched His Feet | त्याने अचानक सर्वांसमोर पकडले जॅकी श्रॉफचे पाय, पाहा पुढे काय घडलं?

त्याने अचानक सर्वांसमोर पकडले जॅकी श्रॉफचे पाय, पाहा पुढे काय घडलं?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ हा 'बॉलिवूडचा भिडू' म्हणून ओळखला जातो.  विनोदी शौलीनं तो अनेकांची मनं जिंकतो. जॅकी श्रॉफ हे तसं बॉलिवूडचं मोठं नाव. पण, इतकं यश आणि प्रसिद्धी मिळवून देखील अभिनेता नेहमीच आपल्या मातीशी नाळ जोडून राहिलेला दिसतो. नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये चाहत्याचे थेट जग्गू दादाचे पायच पकडले. 

जॅकी श्रॉफचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, चाहता जॅकी श्रॉफच्या पायाला स्पर्श करतो. चाहत्याला पायाला हात लावताना पाहून जॅकी श्रॉफ स्वतः खाली वाकून त्याच्या पायाला स्पर्श करतो. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिले, जग्गू दादा खरोखरच डाउन टू अर्थ व्यक्ती आहेत. तर एकाने लिहिले, गॉड ब्लेस यू भीड़ू.


जॅकी श्रॉफ यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये त्याची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. सध्या ते सिनेसृष्टीपासून दूर जरी असले तरी, ते सोशल मिडियावर सक्रिय असतात.  जॅकी गरजुंना मदत करण्यापासून कधीही मागे हटत नाहीत. जॅकी वास्तविक जीवनात एक रिअल जेंटलमन आहेत. 

जॅकी श्रॉफ यांनी मॉडेलिंग आणि जाहिरातींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 1983 मध्ये चित्रपट निर्माते सुभाष घैय यांनी आपल्या प्रसिद्ध चित्रपट हिरोसाठी जॅकीला साई केले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला. 'हिरो' नंतर, जॅकीने 'राम लखन,' कर्मा ',' सौदागर ',' ट्रिमूर्ती', सारख्या 200 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. चाळीत राहणारे जॅकी आता कोट्यधीश आहेत.
 

Web Title: Jackie Shroff Viral Video Fan Touched His Feet And In Return Jackie Shroff Touched His Feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.