'इंडिया VS भारत' वादावर जॅकी श्रॉफचं मोठं वक्तव्य, वाचा काय म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 01:54 PM2023-09-06T13:54:26+5:302023-09-06T13:54:58+5:30
देशाचं नाव 'भारत' की 'इंडिया' यावर राजकीय नेत्यांनंतर बॉलिवुड सेलिब्रेटिंनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.
देशभरात सध्या 'इंडिया' विरुद्ध 'भारत' यावरुन सध्या एकच चर्चा आणि वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. देशाचं नाव 'भारत' की 'इंडिया' यावर राजकीय नेत्यांनंतर बॉलिवुड सेलिब्रेटिंनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. आता बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
#WATCH | On G20 Summit dinner invitations at Rashtrapati Bhawan sent in the name of ‘President of Bharat', Actor Jackie Shroff says, "If Bharat is being called Bharat, it is not a bad thing...we won't change even if the name is changed" (05/09) pic.twitter.com/PTzHE1I3Sa
— ANI (@ANI) September 5, 2023
इंडिया हे नाव बदलून भारत केले जाऊ शकते, याबद्दल त्याला प्रश्न करण्यात आला. तर उत्तरात जॅकीने म्हटले की, "जर तुम्हाला भारताला भारत म्हणायचे आहे. तर काय वाईट गोष्ट नाही. इंडिया म्हणायचे आहे तर इंडियाही ठीक आहे. आता माझे नाव जॅकी आहे. मला कोणी जॉकी तर कोणी जाकी नावाने हाक मारते. नाव बदललं याचा अर्थ मी बदलत नाही. नाव बदललं तर तुम्ही 'इंडियन' आहात हे विसरू नका". दिल्लीतील 'प्लॅनेट इंडिया' मोहिमेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यादरम्यान जॅकीनं हे वक्तव्य केलं.
शिवाय, मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या ट्विटनेही लक्ष वेधून घेतले. बिग बींनी ‘भारत माता की जय” एवढीच घोषणा ट्वीट केली होती. त्याचसोबत अमिताभ बच्चन यांनी भारताचा तिरंगा आणि लाल झेंड्याचा साईनही पोस्ट केले. हे ट्वीट करुन अमिताभ बच्चन यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या ट्वीटवर नेटकरी व्यक्त करताना दिसत आहेत. भारत विरुद्ध इंडिया हा वाद संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी आला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लेटरहेडवरून इंडिया हे नाव हटवण्यात आलं असून प्रेसिडंट ऑफ भारत असं नाव करण्यात आलं आहे. जी २० सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या सहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेमधून इंडिया नाव हटवण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. भाजपविरोधात असणाऱ्या विरोधकांनी आपल्या आघाडीला इंडिया असं नाव दिल्यानंतर हे घडल्याचा काँग्रेस नेत्याचा आरोप आहे.