भाईजानची मदत घेत बॉलिवूडच्या 'या' टॉपच्या अभिनेत्रीने केला मानुषी छिल्लरचा पत्ता कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 14:13 IST2019-07-17T13:57:26+5:302019-07-17T14:13:51+5:30
जवळपास दोन दशकांनंतर 2017मध्ये देशाला मिस वर्ल्डचा किताब जिंकून देणारी मानुषी छिल्लर अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

भाईजानची मदत घेत बॉलिवूडच्या 'या' टॉपच्या अभिनेत्रीने केला मानुषी छिल्लरचा पत्ता कट
जवळपास दोन दशकांनंतर 2017मध्ये देशाला मिस वर्ल्डचा किताब जिंकून देणारी मानुषी छिल्लर अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. मानुषी छिल्लरसलमान खान स्टारर किक 2मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली होती. मात्र हा सिनेमा मानुषीच्या हातून निसटल्याचे समोर येतेय. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या 'किक2' मध्ये मानुषीच्या जागी जॅकलिन फर्नांडिसची एंट्री झाली आहे.
आजतकच्या रिपोर्टनुसार, जॅकलिनला किक2मध्ये कोणत्याही परिस्थित काम करायचे होते. यासाठी तिने सलमान खानकडून साजिद नाडियाडवालाकडे शिफारस केली. ज्यानंतर या सिनेमासाठी जॅकलिनचे नाव कन्फर्म केले आणि अशा पद्धतीने मानुषीकडून जॅकलिनने हा सिनेमा हिसकावून घेतला.
जॅकलिनच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, ती सलमान खानच्या 'रेस3' मध्ये दिसली होती. जॅकलिन सलमानच्या जवळच्या व्यक्तिंपैकी एक मानली जाते. सलमान खानमुळे जॅकलिनला अनेक सिनेमांमध्ये काम मिळाले आहे. अॅक्शन थ्रिलर चित्रपट श्रद्धा आणि प्रभासच्या 'साहो'मध्ये जॅकची एंट्री झाली आहे. या चित्रपटात आयटम साँग करताना दिसणार आहे . प्रभास आणि जॅकलिनचं हे आयटम साँग चक्क ऑस्ट्रेलियामध्ये चित्रीत करण्यात आलं आहे.मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात करणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. २००९ मध्ये जॅक एका मॉडेलिंग शोसाठी भारतात येण्याचे निमित्त झाले आणि ती इथलीच होऊन गेली.