‘या’ चित्रपटात जॅकलीन फर्नांडिसने ताणली खरीखुरी बंदूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 02:22 PM2017-08-24T14:22:50+5:302017-08-24T19:54:27+5:30

आगामी ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटात प्रेक्षकांना तुफान अ‍ॅक्शन बघावयास मिळणार आहे. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिज यांची प्रमुख ...

Jacqueline Fernandes sparked a real gun in this film | ‘या’ चित्रपटात जॅकलीन फर्नांडिसने ताणली खरीखुरी बंदूक!

‘या’ चित्रपटात जॅकलीन फर्नांडिसने ताणली खरीखुरी बंदूक!

googlenewsNext
ामी ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटात प्रेक्षकांना तुफान अ‍ॅक्शन बघावयास मिळणार आहे. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिज यांची प्रमुख भूमिका असून, दोघेही यात अ‍ॅक्शन करताना बघावयास मिळणार आहेत. चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे जॅकलीनने काही सीन्समध्ये खºयाखुºया बंदुकीतून बेछुट गोळीबार केला आहे. विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. असे म्हटले जात आहे की, जॅकलीनने पहिल्यांदाच बंदूक हातात घेतली आहे. विशेष म्हणजे ही बंदूक डेमो बंदूक नव्हती तर खरीखुरी बंदूक होती. अशातही जॅकलीन बंंदूक चालविण्यासाठी उत्सुक होती, हे विशेष. 

श्रीलंकेत जन्मलेल्या जॅकलीनने काही दिवसांपासून म्हटले होते की, मुंबईने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा तिने स्वीकार केला आहे. आता मी उर्दू भाषा शिकण्यास उत्सुुक आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत जॅकलीनने म्हटले होेते की, ‘उर्दू शिकण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. ही एक भाषा आहे, जे खूपच भावणारी आहे. बºयाचदा जेव्हा माझ्या वाचण्यात काही तरी नवीन येते तेव्हा मला त्याविषयी रूची निर्माण होते. त्यावर मी लिखाण करते, त्याचे शिक्षण घेते त्यानंतर माझ्या दैनंदिन व्यवहारात त्याचा वापर करण्याचा मी प्रयत्न करीत असल्याचेही जॅकलीनने म्हटले होते. 



दरम्यान, ‘ए जेंटलमॅन’ हा चित्रपट गौरव आणि ऋषी नावाच्या पात्रांभोवती फिरतो. दोघांमध्ये निर्माण झालेले गैरसमज अन् त्यातून उद्भवणारे विचित्र प्रसंग यात दाखविण्यात आले आहे. एक सुशील सभ्य मुलगा कसा रिस्की जीवन जगतो हे यामध्ये दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज आणि डी. के. यांनी केले असून, २५ आॅगस्ट रोजी चित्रपट रिलीज होत आहे. 

Web Title: Jacqueline Fernandes sparked a real gun in this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.