गुपचूप गुपचूप...! जॅकलिन ‘सीक्रेट बॉयफ्रेण्ड’सोबत होणार शिफ्ट; खरेदी केला 175 कोटींचा बंगला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 02:38 PM2021-06-17T14:38:05+5:302021-06-17T14:40:18+5:30
श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस सध्या चित्रपटामुळे नाही तर सीक्रेट अफेअरमुळे चर्चेत आहे. होय, जॅकलिनच्या आयुष्यात मिस्टर राईटची एन्ट्री झालीये.
श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) सध्या चित्रपटामुळे नाही तर सीक्रेट अफेअरमुळे चर्चेत आहे. होय, जॅकलिनच्या आयुष्यात मिस्टर राईटची एन्ट्री झालीये. इतकेच नाही, या मिस्टर राईटसोबत लवकरच जॅकलिन 175 कोटींच्या बंगल्यात शिफ्ट होणार असल्याचंही कळतंय.
मुंबईच्या जुहू बीचला लागून जॅकलिननं एक अलिशान बंगला खरेदी केला आहे आणि या बंगल्यात ती तिच्या बॉयफ्रेन्डसोबत राहणार आहे. जॅकलिन सध्या एका बिझनेसमॅनला डेट करत असल्याची चर्चा आहे. हा बिझनेसमॅन साऊथचा असल्याचं कळतंय. गेल्या अनेक महिन्यापासून जॅक त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. (Jacqueline Fernandez All Set To Move In Into Rs 175 Cr Lavish Sea Facing Bungalow)
जॅकलिनचा हा बॉयफ्रेंड कोण, त्याचे नाव काय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. येत्या काळात जॅकलिन स्वत:च त्याचे नाव जाहिर करेल, अशी शक्यता आहे.
आधी अरबच्या प्रिन्सला करत होती डेट
मिस युनिव्हर्स श्रीलंका राहिलेली जॅकलिन सिनेमात येण्याआधी टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करत होती. तिने सिडनी युनिव्हर्सिटीमधून मास कम्युनिकेशनच शिक्षण घेतलं होतं. फार कमी लोकांना माहीत आहे की, जॅकलिनचा पहिला बॉयफ्रेन्ड एक प्रिन्स होता. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात ती अरबमधील बहरीनचा प्रिन्स हसन बिन राशिद अली खलीफा याला डेट करत होती. या दोघांची भेट एका कॉमन फ्रेन्डच्या पार्टीमध्ये झाली होती. पुढे जॅकलिनला ‘हाऊसफुल’ सिनेमा मिळाल्यावर दोघे वेगळे झाले. खलीफा हा बहरीनच्या रॉयल फॅमिलीला सदस्य आहे. त्याने Jackie नावाचा एक व्हिडीओ अल्बम रिलीज केला असून हा व्हिडीओ जॅकलिनवर आधारित होता.
15 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकाला करत होती डेट
32 वर्षीय जॅकलिनच्या पहिल्या ब्रेकअपचं कारण दिग्दर्शक साजिद खान याच्याशी वाढलेली जवळीक मानल जातं. खलीफानंतर जॅकलिनचं अफेअर 15 वर्षांनी मोठ्या साजिद खानसोबत होतं. 2009 मध्ये दोघांच्या अफेअरच्या होऊ लागल्या होत्या.
जॅकलिनला बॉलिवूडमध्ये मोठी अभिनेत्री व्हायचं होतं अशात साजिदने तिला यासाठी मदत केली. त्यामुळे जॅकलिनला ‘हाऊसफुल 1’ आणि ‘हाऊसफुल 2’ सिनेमात ब्रेक मिळाला होता. 2012 मध्ये तर त्यांचं नातं लग्नापर्यत पोहोचलं होतं. इतकं की हाऊसफुलच्या सेटवर जॅकलिनला वहिनी म्हणून हाक मारायचे. पण पुढे जॅकलिनला साजिदच्या पझेसिव्हनेसमुळे त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तिने त्याच्यापासून दूर राहणे पसंत केले.
सिद्धार्थसोबतही जोडलं गेलं नाव
जॅकलिनचं नाव सिद्धार्थ मल्होत्रासोबतही जोडलं गेलं होतं. दोघांनी ‘ए जंटलमन’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. याचवेळी दोघांमध्ये जवळीक वाढली होती, असे बोलले जाते. इतकेच काय तर आलिया आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपचं कारणही जॅकलिनला मानलं जातं. पण दोघांना कधीही यावर जाहीरपणे भाष्य केलं नाही.