जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीसह अजून तीन अभिनेत्री होत्या सुकेश चंद्रशेखरच्या निशाण्यावर, दिली होती महागडी गिफ्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 16:07 IST2022-02-23T15:57:06+5:302022-02-23T16:07:44+5:30
Sukesh Chandrasekhar Case: जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यासोबतच अजून तीन अभिनेत्री सुकेश चंद्रशेखरच्या निशाण्यावर होत्या, असी माहिती ईडीच्या तपासामधून समोर आली आहे. यामध्ये Sara Ali Khan, Janhavi Kapoor आणि bhumi pednekar यांची नावं समोर आली आहेत.

जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीसह अजून तीन अभिनेत्री होत्या सुकेश चंद्रशेखरच्या निशाण्यावर, दिली होती महागडी गिफ्ट्स
नवी दिल्ली - २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधिक अजून काही गौप्यस्फोट झाले आहेत. यामध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यासोबतच अजून तीन अभिनेत्री सुकेश चंद्रशेखरच्या निशाण्यावर होत्या, असी माहिती ईडीच्या तपासामधून समोर आली आहे. यामध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर यांची नावं समोर आली आहेत.
सुकेस चंद्रशेखरने सारा अली खान, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर यांची नावं घेतली होती. मे २०२१ मध्ये सारा अली खान हिला सुकेश चंद्रशेखरने टार्गेट केले होते. २१ मे रोजी सुकेश चंद्रशेखरने सारा अली खान हिला व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. तसेच आपली ओळख सुरज रेड्डी असी दिली होती. तसेच त्याने साराला गिफ्ट म्हणून कार देण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, या गिफ्टबाबत सारा अली खान हिची ईडीने चौकशी केली होती. दरम्यान, १४ जानेवारी २०२२ रोजी पत्र लिहून सुकेश चंद्रशेखरने गिफ्टसाठी पिच्छा पुरवल्याचा दावा सारा अली खान हिने केला होता.
सारा अली खानप्रमाणेच जान्हवी कपूरलाही सुकेश चंद्रशेखरन पत्नी लीना मारिया पॉल हिच्या माध्यमातून टार्गेट केले होते. सुकेशच्या पत्नीने जान्हवी कपूर हिला १८ लाख रुपये दिले होते. लीना मारिया पॉल ही एका सलूनची ओनर बनून जान्हवी कपूरला अॅप्रोच झाली होती. तसेच १९ जुलै २०२१ रोजी बंगळुरूमध्ये त्यांनी सलूनच्या ओपनिंगसाठी जान्हवी कपूरला १८ लाख रुपये दिले होते.
तसेच सुकेश चंद्रशेखरने भूमी पेडणेकर हिलाही टार्गेट केले होते. पिंकी इराणीने भूमीला अॅप्रोच कोल होते. पिंकीने आपली ओळख न्यूड एक्स्प्रेस पोस्टची एचआर अशी करून दिली होती. पिंकीने भूमीला सांगितले होते की, त्यांच्या कंपनीच्या ग्रुपचे चेअरमन सुकेश चंद्रशेखर भूमीचे खूप मोठे फॅन आहेत. ते त्यांच्या एका मोठ्या प्रोजेक्टबाबत बोलू इच्छितात. तसेच सुकेश हे एक गिफ्टही देऊ इच्छितात, असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुकेश चंद्रशेखरने तिच्याशी संपर्क साधला होता. दरम्यान, सूरज उर्फ सुकेश चंद्रशेखरकडून आपल्याला कुठलेही गिफ्ट मिळाले नसल्याचे सांगितले.