'दिलबर गर्ल' नोरा फतेहीने 'क्रॅक' चित्रपटात रणबीर कपूरच्या 'या' अभिनेत्रीला केलं रिप्लेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 16:59 IST2023-12-18T16:50:16+5:302023-12-18T16:59:03+5:30
नोरा फतेही लवकरच मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'दिलबर गर्ल' नोरा फतेहीने 'क्रॅक' चित्रपटात रणबीर कपूरच्या 'या' अभिनेत्रीला केलं रिप्लेस
'दिलबर गर्ल' नोरा फतेहीच्या सौंदर्याची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होते. ती बॉलिवू़डमधील सर्वात चांगल्या डान्सर्सपैकी एक मानली जाते. अनेक टीव्ही शोज, म्युझिक व्हिडीओ आणि सिनेमात ती दिसते. नोराने जितकीही गाणी केली ती सगळी सुपरहिट झाली. आता नोरा लवकरच मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
नोरा फतेहीने अनेक गाण्यांमध्ये काम केले असले तरी बॉलिवूडमध्ये मुख्य भुमिकेत मात्र तिने बाजी मारली आहे. मात्र, आता अभिनेत्रीला तिचा पहिला चित्रपट मुख्य भूमिकेत मिळाला आहे. विद्युत जामवालसोबत क्रॅक या चित्रपटात नोरा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.नोरा फतेहीच्या क्रॅक या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रॅप-अप शूटचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
फोटो शेअर करताना नोरा फतेहीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'क्रॅकचे शूटिंग संपले आहे. संपूर्ण टीमसोबतचा माझा अनुभव खूप खास होता. मला लीड म्हणून घेतल्याबद्दल आदित्य दत्त, विद्युत जामवाल आणि संपूर्ण टीमचे आभार. पण मला खूप काही शिकायला मिळाले आणि या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे'.
नोरा फतेहीने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची जागा घेतली आहे. यापूर्वी जॅकलिन विद्युतसोबत मुख्य भूमिकेत झळकणार होती. जॅकलीनने रणबीर कपूरसोबत रॉय, सलमान खानसोबत किक आणि अक्षय कुमारसोबत ब्रदर्ससह अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.