Jacqueline Fernandez : तिला प्रेम हवं होतं..., सुकेश चंद्रशेखरने तुरूंगातून लिहिलं पत्र, जॅकलिनबद्दल केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 11:51 AM2022-10-23T11:51:40+5:302022-10-23T11:52:09+5:30

Jacqueline Fernandez, Sukesh Chandrasekhar : सुकेशने आता तुरूंगातून आपल्या वकीलाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात सुकेशने जॅकलिनबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

jacqueline fernandez has no role in rs 200 scam sukesh chandrasekhar letter from jail | Jacqueline Fernandez : तिला प्रेम हवं होतं..., सुकेश चंद्रशेखरने तुरूंगातून लिहिलं पत्र, जॅकलिनबद्दल केला मोठा खुलासा

Jacqueline Fernandez : तिला प्रेम हवं होतं..., सुकेश चंद्रशेखरने तुरूंगातून लिहिलं पत्र, जॅकलिनबद्दल केला मोठा खुलासा

googlenewsNext

महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar ) 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये दिल्लीच्या मंडोली तुरूंगात बंद आहे. सुकेशसोबत या प्रकरणात बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही सुद्धा अडकली आहे. सुकेशने आता तुरूंगातून आपल्या वकीलाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात सुकेशने जॅकलिनबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

पत्रात काय म्हणाला सुकेश
वकीलाला लिहिलेल्या पत्रात सुकेशने जॅकलिनची बाजू घेत, 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिची काहीही भूमिका नसल्याचं म्हटलं आहे. त्याने लिहिले, ‘मी जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्यात. कार दिली. कारण मी जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. रिलेशनशिपमध्ये असताना मी तिला व तिच्या कुटुंबाला या भेटवस्तू दिल्या होत्या. यात तिचा काय दोष? पीएमएलए प्रकरणात तिचं नाव गोवलं जाणं हे फारच दुर्दैवी आहे. जॅकलिनला माझ्याकडून काहीही नको होतं. तिने फक्त माझ्याकडून प्रेम आणि सोबतीची अपेक्षा केली होती. याशिवाय तिने मला कधीच काही मागितलं नाही. जॅकलिन व तिच्या कुटुंबावर खर्च करण्यात आलेला एक एक पैसा कायदेशीररित्या कमावलेला आहे आणि लवकरच कोर्टात हे सिद्ध होईल.’
पुढे तो लिहितो, ‘मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन व तिच्या कुटुंबाला ओढण्याची काहीही गरज नव्हती. त्यात तिची काहीही चूक नाही आणि हे मी लवकरच कोर्टात सिद्ध करेल. जॅकलिनने जे काही गमावलं, ते एक दिवस मी तिला नक्की मिळवून देईल. तिला पूर्णपणे निर्दोष सिद्ध करेल.’
सुकेश चंद्रशेखर  याच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाी सध्या ईडीकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात जॅकलीन सहआरोपी आहे.  


 
नेमकं काय आहे प्रकरण? 
200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरवर दिग्गज लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनही आरोपी आढळली होती. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुराव्यांचा आधार घेण्यात आला. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केल्यानंतर तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता.   सुकेशवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. याच पैशातून त्याने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. जॅकलिन फर्नांडिला देखील त्याने अनेक महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख रुपए होती. तर प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली 36 लाख रूपयांची 4 पर्शियन मांजरं देखील जॅकलिनला देण्यात आली होती. 

Web Title: jacqueline fernandez has no role in rs 200 scam sukesh chandrasekhar letter from jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.