Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, २१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 01:31 PM2022-08-17T13:31:19+5:302022-08-17T13:31:44+5:30

Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. २१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्रीवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Jacqueline Fernandez: Jacqueline Fernandez's troubles increase, charge sheet filed in extortion case of 215 crores | Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, २१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल

Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, २१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez)च्या अडचणीत वाढ झालीय. २१५ कोटींच्या खंडणी प्रकरणी अभिनेत्रीवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला माहिती होती की, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) खंडणी वसूल करणार आहे. त्यानंतर आता अंमलबजावणी  संचालनालयाने (ED - Enforcement Directorate) जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल केलंय. ईडीने २१५ कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला आरोपी असल्याचे म्हटलंय.

ईडीने समन्स बजावल्यानंतर जॅकलिन फर्नांडिसची दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली होती. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलिनचे नाव समोर आलंय. सुकेश चंद्रशेखरकडून महागडी जनावरं गिफ्ट घेणे अंगाशी आलंय. मुंबई विमानतळावर ईडीनं तिला थांबवलं होतं. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी झाली असल्याची माहिती आहे. 


जॅकलीन एका कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ५ तारखेला मुंबई एअरपोर्टवर तिला थांबवले होते. सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर या बिझनेसमने एकूण ५ जनावरे जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते.अगदी ५६ लाखांचा घोडा, ३६ लाखांच्या चार मांजरी अशा अनेक महागड्या भेटवस्तू देत त्याने तिच्यावर कोट्यावधी रूपये उधळले होते.

जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटोदेखील समोर आला होता. हा फोटो समोर आल्यानंतर जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून २०० कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारीच आरोपपत्र दाखल केले होते.

Web Title: Jacqueline Fernandez: Jacqueline Fernandez's troubles increase, charge sheet filed in extortion case of 215 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.