पनवेलच्या फार्महाऊसमध्ये जॅकलिन फर्नांडिसला भेटली नवीन फ्रेंड, आहे खूप क्युट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 13:00 IST2020-05-08T12:59:45+5:302020-05-08T13:00:25+5:30
जॅकलिनने नवीन फ्रेंडचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

पनवेलच्या फार्महाऊसमध्ये जॅकलिन फर्नांडिसला भेटली नवीन फ्रेंड, आहे खूप क्युट
जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरूच आहे आणि सामान्य जनतेप्रमाणे सेलिब्रेटी सुद्धा आपल्या घरात वेळ घालवत आहेत. तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससलमान खान आणि त्याचे कुटुंबिय आणि मित्रांसोबत पनवेलच्या फार्महाऊसमध्ये आहेत. तिथे राहून जॅकलिन सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करताना दिसते. नुकताच तिने एका नवीन फ्रेंडचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
नुकताच जॅकलिनने नवीन फ्रेंड जेनीचा फोटो शेअर केला आहे. तिची ही नवीन फ्रेंड खूप क्युट आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की,माय फ्रेंड जेनी.
जॅकलिन व जेनीच्या फोटोला खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.
यापूर्वी जॅकलिनने तिथे राहून एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे, जी तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. या शॉर्टफिल्ममध्ये ती अनेक कामे करताना दिसते आहे. व्हिडिओमध्ये जॅकलिन घोडेस्वारी करते, कपडे वाळत घालते, नारळाच्या झाडावर चढते, वाचन करते आणि आराम करताना दिसते आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ तिच्या फॅन्सना खूप आवडतोय. जॅकलिननंतर सलमाननं पण तिचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
सलमान खानसोबत त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर जॅकलिन फर्नांडिस, यूलिया वंतूर सलमानच्या दोन्ही बहिणी अलवीरा आणि अर्पिता खान आपल्या पती आणि मुलांसोबत आहेत. त्यांनी अनेक गरजूंची मदत केली आणि किराणा सामान पोहोचवले.
सलमानने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यात फार्महाऊसमध्ये असलेले सर्व जण ट्रॅक्टरमध्ये किराणा सामानाच्या पिशव्या भरत होते, जेणेकरून ते सामान गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकेल. या व्हिडिओमध्ये जॅकलिन आणि यूलिया वंतूर पण दिसत होती.