Video : कोर्टाबाहेर Jacqueline Fernandezची अवस्था पाहून भडकले फॅन्स, अनेकांना झाली रिया चक्रवर्तीची आठवण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 02:42 PM2022-11-16T14:42:38+5:302022-11-16T14:44:38+5:30
Jacqueline Fernandez Mobbed Outside Patiala House Court : सुनावणीवेळी जॅकलिन कोर्टात हजर होती. सुनावणीनंतर ती कोर्टाबाहेर आली. पण याठिकाणी बाहेर उभी गर्दी अक्षरश: तिच्यावर जुटून पडली...
200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी महाठग सुकेश चंद्रशेखर याच्यासोबतच्या संबंधांमुळे जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) चर्चेत आहे. सुकेशसोबत या प्रकरणात जॅकलिनचंही नाव आलंय. मंगळवारी पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला जामीन दिला. या प्रकरणात जॅकलिन अगोदरपासूनच अंतरिम जामिनावर बाहेर होती. मंगळवारी या प्रकरणाच्या सुनावणीवेळी जॅकलिन कोर्टात हजर होती. सुनावणीनंतर ती कोर्टाबाहेर आली. पण याठिकाणी बाहेर उभी गर्दी अक्षरश: तिच्यावर जुटून पडली. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. हे व्हिडीओ पाहून अनेकांना रिया चक्रवर्तीची आठवण झाली.
सुशांत सिंग प्रकरणात रिया चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचली होती तेव्हा तेव्हा तिच्यासोबतही असंच काही घडलं होतं. काल जॅकलिनसोबतही असंच काही घडलं.
#WATCH | Jacqueline Fernandez leaves from Delhi's Patiala House Court after getting bail in Rs 200 crores money laundering case involving alleged conman Sukesh Chandrashekhar pic.twitter.com/d1qjSaLZeg
— ANI (@ANI) November 15, 2022
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जॅकलिनचा व्हिडीओ एनएआयचा आहे. आपल्या वकीलांच्या टीमसोबत ती कोर्टाबाहेर पडताना या व्हिडीओत दिसते. ती कोर्टाबाहेर येताच, मीडिया, वकीलांची गर्दी तिला घेरते. या गर्दीतून वाट काढणं जॅकलिनला कठीण होतं. तिथे हजर पोलिस व सुरक्षा कर्मचारी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्यात जॅकलिन गर्दीतून बाहेर पडण्यासाठी धडपडताना दिसते. यावेळी जॅकलिन केअरफुल...केअरफुल... असं म्हणतानाही दिसते.
Media persons swarm around actor #JacquelineFernandez after she walks out of court premises. #MoneyLaundering@Asli_Jacqueline@dir_edpic.twitter.com/0M7WXhaOqX
— Bar & Bench (@barandbench) November 15, 2022
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. फारच चुकीचं आहे.... अशापद्धतीने एखाद्याचा पाठलाग करणे माझ्यामते योग्य नाही. हिला पाहून रिया चक्रवर्तीची आठवण येतेय. तिच्यासोबतही असंच झालं होतं, असं एका युजरने लिहिलं. अन्य एका युजरनेही आपला संताप व्यक्त केला. जेव्हाकेव्हा सेलिब्रिटीची केस येते, तेव्हा असंच चुकीचं वागलं जातं. आपण माणुसकी विसरलो का? असं या युजरने लिहिलं.
A Delhi court grants bail to Bollywood diva Jacqueline Fernandez in Rs 200 Cr extortion case involving conman Sukesh Chandrasekhar today.
— The New Indian (@TheNewIndian_in) November 15, 2022
Reports @Anand_Journpic.twitter.com/GsSNeHAojd
ईडीने 215 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरोधातही आरोपपत्र दाखल केले आहे. सुकेश चंद्रशेखरने तिला सुमारे 7 कोटी रुपयांचे दागिने गिफ्ट केल्याचा आरोप जॅकलिनवर आहे. सुमारे 9 लाख रुपये किमतीच्या 3 पर्शियन मांजरी, सुमारे 52 लाख रुपये किमतीचा एक अरबी घोडा, 15 जोड्या इअर-रिंग्ज, कॉइल, डायमंड सेट, मौल्यवान क्रॉकरी, गुच्ची आणि चॅनेलसारख्या महागड्या ब्रँडच्या डिझायनर बॅग्ज, जीमी चू, गुच्ची या ब्रँड्सचे पोशाख, लुई व्हिटॉनचे शूज, दोन हमी ब्रेसलेट, एक मिनी कूपर कार तसेच महागडी रोलेक्स घड्याळे त्याने तिला भेट दिली. जॅकलिनचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते. ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की, जॅकलिनला सुकेशच्या काळ्या कारनाम्यांची माहिती होती, परंतु तरीही तिने त्याच्या महागड्या भेटवस्तू स्वीकारल्या.