बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं बुरख्याऐवजी दागिन्यांनी लपविला चेहरा, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 10:55 AM2019-11-27T10:55:04+5:302019-11-27T10:55:39+5:30

सोशल मीडियावरील या फोटोमुळे ही अभिनेत्री आली आहे चर्चेत

Jacqueline Fernandez shared new phtoto on social media | बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं बुरख्याऐवजी दागिन्यांनी लपविला चेहरा, फोटो होतोय व्हायरल

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं बुरख्याऐवजी दागिन्यांनी लपविला चेहरा, फोटो होतोय व्हायरल

googlenewsNext

चिट्टीयां कल्लाईयां वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने बॉलिवूडमध्ये आज तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. फक्त अभिनयावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत. जॅकलिनने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 

जॅकलिन फर्नांडिसने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत तिने तिचा चेहरा चक्क दागिन्यांनी झाकला आहे. त्यामुळे तिचा हा फोटो चर्चेत आला आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

आता हिने चेहऱ्यावर मेकअपसोबत दागिने का वापरले आहेत, असा प्रश्न सगळ्यांना पडतो आहे. तिने असा गेटअप दुबईतील अरेबियन नाईटसाठी केला आहे. इतकेच नाही तर तिने हा गेटअप करतानाचा व्हिडिओदेखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  

जॅकलिनने 'अलादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नुकताच जॅकलिनचा ड्राइव्ह हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत महत्त्वाच्या भूमिकेत होते.

ती आता कार्तिक आर्यनसोबत किरिक पार्टी या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. तसेच किकच्या सिक्वलमध्ये ती सलमानसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.

Web Title: Jacqueline Fernandez shared new phtoto on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.