जॅकलिन फर्नांडिस राजस्थानमध्ये करतेय 'बच्चन पांडे'चे शूटिंग, अक्षय कुमारसोबत करणार रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 21:22 IST2021-02-19T21:22:05+5:302021-02-19T21:22:33+5:30
जॅकलिन फर्नांडिसने राजस्थानमध्ये आपल्या आगामी 'बच्चन पांडे' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे.

जॅकलिन फर्नांडिस राजस्थानमध्ये करतेय 'बच्चन पांडे'चे शूटिंग, अक्षय कुमारसोबत करणार रोमान्स
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने राजस्थानमध्ये आपल्या आगामी 'बच्चन पांडे' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. या चित्रपटातील हे जॅकलिनचे पहिले शूट शेड्यूल आहे. या शूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोवरून जॅकलिनचे जोरदार शूटिंग सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
या शूटवरील एका व्हिडिओत जॅकलिन आणि तिची संपूर्ण टिम एकदम उत्साहात काम करत असल्याचे दिसून येत आहे. यात जॅकलिन चाहत्यांना सांगत आहे की, आमची संपूर्ण टीम कोणतीही विश्रांती न घेता दिवस-रात्र काम करत आहे. जॅकलीन आपल्या संपूर्ण टीमसह नुकतीच राजस्थानमध्ये दाखल झालेली आहे.
जॅकलिन फर्नांडिस ही 'हाउसफुल २′ आणि ३ नंतर आपल्या सह कलाकारांसह 'बच्चन पांडे'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करत आहे. जॅकलिनकडे सध्या एकूण ४ बिग बजेट चित्रपट आहेत. यापैकी 'बच्चन पांडे' हा एक चित्रपट आहे.
दरम्यान, जॅकलिन ही जानेवारीच्या संपूर्ण महिन्यात 'भूत पुलिस' आणि 'सर्कस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होती. जॅकलिन अनेक बिग बजेट असलेल्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.
रोहित शेट्टीच्या 'सर्कस'मध्ये ती रणवीर सिंगसोबत झळकणार आहे. तसेच सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूरसोबत 'भूत पुलिस', तर सलमान खानसोबत 'किक-२'मध्येही स्क्रीन शेअर करणार आहे.
जॅकलिन फर्नांडिसने अलादीन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जॅकलिनला खरी ओळख किक चित्रपटातून मिळाली. या चित्रपटातील तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती.