जॅकलिन फर्नांडिस हरवलेल्या बहिणीसोबत येणार चाहत्यांच्या भेटीला, जाणून घ्या कोण आहे ही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 04:05 PM2020-08-20T16:05:00+5:302020-08-20T16:05:17+5:30

जाणून घ्या कोण आहे ही जॅकलिन फर्नांडिसची हरवलेली बहीण

Jacqueline Fernandez to visit fans with missing sister, find out who she is | जॅकलिन फर्नांडिस हरवलेल्या बहिणीसोबत येणार चाहत्यांच्या भेटीला, जाणून घ्या कोण आहे ही

जॅकलिन फर्नांडिस हरवलेल्या बहिणीसोबत येणार चाहत्यांच्या भेटीला, जाणून घ्या कोण आहे ही

googlenewsNext

चिट्टीयां कल्लाइयां वे असं म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर 90 मिलियनहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला असून ती एका नव्या पॉडकास्ट शोसाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, नेटकऱ्यांसाठी जॅकलिनची 'हरवलेली बहिण' म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री अमांडा सेर्नी या शोमध्ये जॅकलिनसोबत दिसणार आहे. अमांडाचे देखील यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 45 मिलियनहून अधिक फॉलोअर्स असून अमांडा हॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

जॅकलिन अमांडाच्या या नव्या पॉडकास्ट व्हिडिओ शोचे नाव असणार आहे 'फील्स गुड'. ज्यामध्ये जगभरातील प्रेरणादायक बातम्या, समीक्षा आणि असणार आहेत अनपेक्षित पाहुण्यांसोबतच्या भेटीगाठी. या शोमध्ये डेटिंग, वेलनेस आणि संस्कृति यांवरच्या चर्चा असून यातील कंटेंट दर्शकांना सकारात्मकतेच्या अंगाने नेणारा असेल. हा शोची घोषणा पॉडकास्ट मंचावरील प्रसिद्ध पॉडकास्ट वनद्वारे करण्यात आली आहे.



या शो विषयी बोलताना जॅकलिन आणि अमांडा म्हणाल्या की,"आम्ही जे करतो ते आम्हाला आवडते आहे आणि वेलनेस, संस्कृति, डेटिंग, सकारात्मक बातम्यांसोबत कधी कधी अनपेक्षित पाहुणे... या नव्या मंचाच्या विचारानेच आम्हाला खूप उत्साहित वाटते आहे."


जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती आगामी चित्रपटात जॉन अब्राहम सोबत दिसणार आहे, याआधी 'हाउसफुल 2', 'रेस 2' आणि 'ढिशूम'सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. यासोबतच ती 'किक' फ्रेंचाइजीच्या दूसऱ्या भागामध्ये देखील ती असणार आहे, ज्याची घोषणा लवकरच करण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: Jacqueline Fernandez to visit fans with missing sister, find out who she is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.