WHAT? महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करणार होती जॅकलिन? अक्षय-सलमाननं केलं होतं सावध...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 06:27 PM2022-09-18T18:27:09+5:302022-09-18T18:31:13+5:30

Jacqueline Fernandez : महाठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला सुमारे 10 कोटींचे दागिने व अनेक महागड्या वस्तू गिफ्ट केल्या होत्या. आता जॅकलिन व सुकेश यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर येतेय. 

jacqueline fernandez wants to marry sukesh chandrashekhar | WHAT? महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करणार होती जॅकलिन? अक्षय-सलमाननं केलं होतं सावध...

WHAT? महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करणार होती जॅकलिन? अक्षय-सलमाननं केलं होतं सावध...

googlenewsNext

महाठग सुकेश चंद्रशेखरच्या  (Sukesh Chandrashekhar) 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) हिच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. ईडीने तिच्याविरोधातही आरोपपत्र दाखल केलं आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला सुमारे 10 कोटींचे दागिने व अनेक महागड्या वस्तू गिफ्ट केल्या होत्या. आता जॅकलिन व सुकेश यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर येतेय. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन सुकेशच्या जाळ्यात अलगद अडकली होती आणि पुढे फसत गेली. अगदी सुकेशसोबत लग्नाचे विचारही तिच्या डोक्यात येत होते. सुकेश हा जॅकलिनचा ड्रिमबॉय होता आणि अगदी त्याच्यासोबत लग्न करायलाही ती तयार होती. मला माझा ड्रिम बॉय मिळाला आहे, असं जॅकलिन तिच्या मित्रांसमोर बोलली होती. याचप्रकरणी  EOW  ने जॅकलिनच्या ड्रेस डिझाईनरला समन्स जारी केला आहे. उद्या सोमवारी टीम तिची चौकशी करणार आहे. 

जॅकलिनना इम्प्रेस करण्यासाठी सुकेशने जॅकलिनच्या ड्रेस डिझाईनरला मोठी रक्कम दिली होती व महागडे ड्रेस पाठवले होते, असं तपासात समोर आलं आहे.

अक्षय व सलमानने केलं होतं सावध?
सुकेशच्या लाईफ स्टाईलने आपल्याला खूप प्रभावित केलं होतं, अशी कबुली खुद्द जॅकलिनने दिल्ली पोलिसांसमोर दिल्याचे कळते. एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन सुकेशकडून महागडे गिफ्ट घ्यायची. त्याला भेटायची. अगदी त्याच्यात ती गुंतली होती. जॅकलिनला सुकेशशी लग्न करायचं होतं. तिने  अक्षय कुमार आणि सलमान खान यांनाही आपल्या लग्नाच्या प्लॅनबद्दल सांगितलं होतं. विशेष म्हणजे, या दोघांनीही तिला सुकेशपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र जॅकलिनने त्याकडे दुर्लक्ष केलं. ती सुकेशला भेटत राहिली.
आपल्याला सुकेशच्या लग्नाबद्दल काहीही माहित नसल्याचं जॅकलिनचं म्हणणं आहे. सुकेश लीना मारिया पॉलसोबत लिव्ह इनमध्ये आहे, फक्त इतकंच तिला माहित होतं.

सुकेशने जॅकलिनला प्रभावित करण्यासाठी तिच्या मॅनेजरला डुकाटी बाईकही भेट दिली होती, जी नंतर दिल्लीतून जप्त करण्यात आली आहे.
सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याप्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं  नाव समोर आलं होतं.  सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेल्या एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश होता.

Web Title: jacqueline fernandez wants to marry sukesh chandrashekhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.