बहरीनच्या राजासोबत बॉलिवूडची ही अभिनेत्री होती रिलेशनशीपमध्ये, चित्रपटामुळे झालं होतं ब्रेकअप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:38 IST2019-08-13T14:36:18+5:302019-08-13T14:38:53+5:30
बॉलिवूडची ही अभिनेत्री बहरीनच्या राजासोबत बराचा काळ रिलेशनशीपमध्ये होती.

बहरीनच्या राजासोबत बॉलिवूडची ही अभिनेत्री होती रिलेशनशीपमध्ये, चित्रपटामुळे झालं होतं ब्रेकअप
चिट्टीयां कल्लाईयां वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने 'अलादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. जॅकलिनने मिस श्रीलंका हा किताब पटकावला होता.
जॅकलिनचे वडील श्रीलंकन असून तिची आई मलेशियातील आहे. तिचे भारतसोबत खास कनेक्शन आहे. ते म्हणजे तिचे आजी आजोबा गोव्याचे होते. जॅकलिनला इंग्रजी, हिंदीशिवाय फ्रेंच, स्पॅनिश व अरेबिक भाषादेखील येते. तिने सिडनीमधून मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.
टाईम्स नाऊ न्यूजच्या रिपोर्टनुसार, जॅकलिन बहरीनचा राजा प्रिन्स शेख हसन राशिद अल खलीफासोबत बऱ्याच काळापासून रिलेशनशीपमध्ये होती. एका कॉमन फ्रेंडच्या पार्टींमध्ये ती हसनला भेटली होती. हाऊसफुल २ चित्रपट प्रदर्शित होता होता ब्रेकअप झालं होतं.
राजा खलिफासोबतच्या ब्रेकअपचं कारण साजिद खान होता. जॅकलिनचं साजिद सोबतही बराच काळ रिलेशनशीपमध्ये होते. २०१३ साली दोघांचं ब्रेकअप झालं. साजिद खानने देखील तिच्यावर काही आरोप केले होते.
साजिदनं एका पत्रकार परिषदेत जॅकलिनचं नाव न घेता त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रत्येक गोष्टीत संशय घेत होती. त्यामुळे ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं. याशिवाय त्याचे चित्रपट फ्लॉप होण्यामागेदेखील जॅकलिन जबाबदार असल्याचं सांगितलं होतं.
जॅकलिम शेवटची सलमान खान सोबत रेस ३ चित्रपटात झळकली होती.