४४ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्याचं कमालीचं ट्रान्सफॉर्मेशन, ५ महिन्यांत घटवलं २६ किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 09:56 AM2024-06-25T09:56:07+5:302024-06-25T09:56:42+5:30
एका बॉलिवूड अभिनेत्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा रंगली आहे. बॉलिवूड सिनेमातील भूमिकेसाठी या अभिनेत्याने ५ महिन्यांत तब्बल २६ किलो वजन घटवलं आहे.
अनेक सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सिनेमात किंवा मालिकांमध्ये विविध भूमिका साकारण्यासाठी कलाकारांना त्यांच्या लूकमध्ये अनेकदा बदल करावा लागतो. कधी कधी भूमिकेसाठी वजन वाढवावं लागतं तर कधी कमी करावं लागतं. आता अशाच एका बॉलिवूड अभिनेत्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा रंगली आहे. बॉलिवूडसिनेमातील भूमिकेसाठी या अभिनेत्याने ५ महिन्यांत तब्बल २६ किलो वजन घटवलं आहे.
अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याच्या फॅट टू फिट प्रवासाबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. आधीचा आणि आताचा फोटो त्याने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने वेट लॉस जर्नीबद्दल सांगितलं आहे. ५ महिन्यांत २६ किलो वजन घटवल्याचं त्याने म्हटलं आहे. या अभिनेत्याचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे. फोटो पाहून त्याने किती मेहनत घेतली आहे, हे स्पष्ट दिसून येतंय. हा अभिनेता म्हणजे जयदीप अहलावत.
जयदीपने 'महाराज' या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमासाठी हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. "५ महिन्यांत १०९.७ किलो ते ८३ किलो...महाराज या भूमिकेसाठी केलेलं हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल प्रज्वल सर थँक्यू", असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री रिचा चढ्चाने कमेंट कर "बढ़िया" असं म्हटलं आहे.
दरम्यान, 'महाराज' हा सिनेमा अलिकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा लेक जुनैद खानने अभिनयात पदार्पण केलं आहे. या सिनेमात जयदीप अहलावतने महाराज ही भूमिका साकारली आहे. जयदीप आणि जुनैदच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.