जायरा वसीम प्रकरणातील आरोपीवर जामिनानंतरही टांगती तलवार कायम!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 12:03 PM2017-12-31T12:03:00+5:302017-12-31T17:33:00+5:30

‘सीक्रेट सुपरस्टार’ची अभिनेत्री जायरा वसीम प्रकरण सध्या देशभर चर्चिले जात आहे. काही दिवसांपूर्वी विस्ताराच्या फ्लाइटमध्ये प्रवास करीत असताना जायरासोबत ...

Jaira Waseem murder case even after bail | जायरा वसीम प्रकरणातील आरोपीवर जामिनानंतरही टांगती तलवार कायम!

जायरा वसीम प्रकरणातील आरोपीवर जामिनानंतरही टांगती तलवार कायम!

googlenewsNext
ीक्रेट सुपरस्टार’ची अभिनेत्री जायरा वसीम प्रकरण सध्या देशभर चर्चिले जात आहे. काही दिवसांपूर्वी विस्ताराच्या फ्लाइटमध्ये प्रवास करीत असताना जायरासोबत छेडछाडीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी संशयित आरोपी विकास सचदेवा याला गेल्या १० डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई न्यायालयाने विकासला २५ हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन दिला. मात्र अशातही विकास आणि त्याच्या परिवाराच्या अडचणी संपता संपत नसताना दिसत आहे. सूत्रानुसार, विकास आणि त्याचा परिवार अजूनही या प्रकरणातून सुटकेचा नि:श्वास घेऊ शकली नाही. कारण विकासच्या या प्रकरणाची सुनावणी पुढच्यावर्षी २ जानेवारी रोजी होणार आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून ठोस निर्णय येण्याची शक्यता आहे. 

दिल्लीहून मुंबईला विस्तारा एअरलाइन्सने परताना फ्लाइटमध्ये संशयित आरोपी विकास सचदेवाने जायरासोबत छेडछाड केल्याचा आरोप तिने केला होता. याप्रकरणी ३९ वर्षीय विकासवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्याच्या काही दिवसांनंतर न्यायालयाने काही अटीशर्तीवर त्याला जामीनही मंजूर केला. 



या संपूर्ण प्रकरणात विकासची पत्नी दिव्या सचदेवा हिने समोर येत जायराचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. दिव्याने म्हटले होते की, ‘माझे पती दिल्ली येथून मामाचे अंत्यसंस्कार करून परतत होते. गेल्या २४ तासांपासून ते झोपले नसल्याने प्रचंड अपसेट होते. त्यांनी क्रूला ब्लॅकेंट मागितले होते. तसेच मला कोणी डिस्ट्रब करू नये, असेही त्यांनी सांगितले होते. यावेळी त्यांनी जेवण करण्यासही नकार दिला होता. झोपेत त्यांचा पाय जायराला लागला. याबद्दल त्यांनी नंतर तिची माफीही मागितली होती. परंतु पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी तिने हा सर्व खटाटोप केला. 

यावेळी दिव्याने जायराच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले होते की, जर तुझ्यासोबत हे सर्व घडत होते तेव्हा तू का आरडाओरड केली नाहीस? घटना घडल्याच्या दोन तासांनंतर तू इन्स्टाग्रामवर कशाला याविषयीची वाच्यता केली? असे प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर विस्तारानेदेखील याप्रकरणी मिनिस्ट्रीला दिलेल्या अहवालात आमच्या क्रूने तिच्यासोबत छेडछाड होताना बघितले नसल्याचे सांगितले. तसेच एका पॅसेंजरनेही असे काहीच घडले नसल्याचे म्हटले होते. 

Web Title: Jaira Waseem murder case even after bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.