माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत थिरकली जान्हवी कपूर, विसर्जन मिरवणूकीत केला गणपती डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 15:10 IST2023-09-28T12:51:39+5:302023-09-28T15:10:03+5:30
जान्हवी आणि शिखर पहाडिया गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत थिरकली जान्हवी कपूर, विसर्जन मिरवणूकीत केला गणपती डान्स
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची ती मुलगी. जान्हवीने 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या ती बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करतेय. नुकत्याच रिलीज झालेल्या 'बवाल' सिनेमातील भूमिकेसाठी तिचं कौतुक झालं. जान्हवी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत गणपती विसर्जनात नाचतानाचा जान्हवीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जान्हवी आणि शिखर पहाडिया (Shikhar Pahariya) गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत्या. मात्र दुरावा सहन न झाल्याने त्यांच्यात परत पॅचअप झालं. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. जान्हवी आणि शिखर कधी तिरुपती मंदिराच्या दर्शनाला एकत्र दिसले तर कधी डिनर डेटवर दिसले. दोघांनी रिलेशनशिप मान्य केलं नसलं तरी ते खुलेआम हातात हात घालून फिरताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानींच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत जान्हवी शिखरसोबत नाचताना दिसली. ढोलताशाच्या गजरात दोघंही गणपती डान्स करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर गुलालही लागलेला दिसतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यांचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
जान्हवी लवकरच राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही' या सिनेमात दिसणार आहे. तर दाक्षिणात्या सिनेमातही ती ज्युनिअर एनटीआरसोबत झळकणार आहे.