माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासह जान्हवी कपूरची व्हॅकेशन ट्रीप? एअरपोर्टवरील व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 16:35 IST2023-10-09T16:34:34+5:302023-10-09T16:35:36+5:30
जान्हवी शिखर पहाडियासोबत व्हॅकेशन ट्रिपला जात असल्याची चर्चा आहे. जान्हवी आणि शिखरचा एअरपोर्टवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासह जान्हवी कपूरची व्हॅकेशन ट्रीप? एअरपोर्टवरील व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जान्हवी गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअपही झालं होतं. पण, आता ते पुन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. जान्हवी आणि शिखर यांना अनेकदा एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता जान्हवी शिखर पहाडियासोबत व्हॅकेशन ट्रिपला जात असल्याची चर्चा आहे. जान्हवी आणि शिखरचा एअरपोर्टवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जान्हवी आणि शिखरला नुकतंच एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. ते एकत्र कॅमेरासमोर दिसले नाहीत. पण, एअरपोर्टवरील त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जान्हवी शिखरबरोबर असल्याचं दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून ते दोघेही एकत्र व्हॅकेशनला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन जान्हवी आणि शिखरचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांचा शिखर हा धाकटा मुलगा आहे. स्मृती या एक उद्योजिका आहेत. त्या चित्रपट निर्मात्याही आहेत. शिखरला एक भाऊही आहे. त्याचं नाव वीर पहाडिया आहे.