अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये जान्हवी कपूरने बॉयफ्रेंडला भरवला 'प्रेमाचा घास', Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 16:21 IST2024-06-02T16:20:44+5:302024-06-02T16:21:34+5:30
जान्हवी आणि शिखर पहाडिया यांच्या क्युट व्हिडिओ

अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये जान्हवी कपूरने बॉयफ्रेंडला भरवला 'प्रेमाचा घास', Video व्हायरल
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा प्री वेडिंग सोहळा सध्या इटलीत पार पडत आहे. इटटीलीत एका क्रुजवर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याचं सेलीब्रेशन सुरु आहे. अनेक तारे तारका, दिग्गज मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. दरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींचे क्रुजवरील व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. त्यात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचा (Shikhar Pahariya) एक क्युट व्हिडिओ समोर आला आहे.
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लव्हबर्ड्स अनेक ठिकाणी सोबत दिसून येतात. इटलीत सुरु असलेल्या अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यातही यांची झलक दिसून आली आहे. जान्हवी यामध्ये मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेत आहे. तर शिखर पहाडियाही गप्पा मारत आहे. तेव्हा जान्हवी हळूच शिखरला भरवताना दिसते. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत लिहिले, 'चोरी चोरी चुपके चुपके','क्यट जोडी' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काही ट्रोलर्सने जान्हवीवर निशाणाही साधला आहे.
जान्हवी आणि शिखर वयाच्या १५ व्या वर्षापासून एकमेकांना ओळखत आहेत. 2013 पासून ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नतंर त्यांचं नातं तुटलं. तरी शिखर जान्हवीची वाट पाहत होता. अखेर जान्हवी पुन्हा शिखरकडे परत आली. आता दोघंही ऑफिशियली सोबत असल्याचं पाहायला मिळतं. शिखर पहाडियाहा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. स्मृती शिंदे ही त्याची आई आहे. जान्हवीचं तिच्या होणाऱ्या सासूसोबतही छान बाँडिंग आहे.