"ती गोष्ट मी केली नसती तर..."; श्रीदेवीला दिलेल्या या वागणुकीचा जान्हवी कपूरला होतोय आजही पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:31 IST2025-02-10T18:28:18+5:302025-02-10T18:31:59+5:30
श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने आईबद्दल सांगितली भावुक आठवण. काय म्हणाली? (jahnavi kapoor,

"ती गोष्ट मी केली नसती तर..."; श्रीदेवीला दिलेल्या या वागणुकीचा जान्हवी कपूरला होतोय आजही पश्चाताप
जान्हवी कपूर (janhvi kapoor) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. जान्हवीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. जान्हवी गेल्या काही वर्षांपासून विविध भूमिका साकारुन बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे. जान्हवी आणि तिची आई अन् सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांंचं चांगलं नातं होतं. श्रीदेवीचं (sridevi) काही वर्षांपूर्वी निधन झालं. तरीही जान्हवीच्या मनात आईबद्दल कायम आदर आहे. आणि हे प्रेम असंच राहणार आहे. परंतु जान्हवीला एका गोष्टीचा पश्चाताप आहे. ज्यावेळी तिने श्रीदेवीला सेटवर येण्यास मनाई केली होती.
जान्हवीला अजूनही या गोष्टीचा पश्चाताप
जान्हवीने एका मुलाखतीत सांगितलं की, "ज्यावेळी मी माझा पहिला सिनेमा धडकचं शूटिंग करत होती त्यावेळी आईला सेटवर माझ्यासोबत यायचं होतं. अनेकदा ती स्वतःहून सेटवर यायची. परंतु नंतर मात्र मी आईला सेटवर येऊ नको असं सांगितलं. कारण मी श्रीदेवीची मुलगी आहे आणि याचा फायदा मी घेत आहे, हे कोणाला वाटू नये अशी माझी इच्छा होती. कारण तसंही मी श्रीदेवीची मुलगी आहे म्हणून मला पहिला सिनेमा मिळालाय, असंच सर्वांना वाटत होतं."
"परंतु आज मला या गोष्टीचा पश्चाताप होतो की, मी आईला सेटवर येण्यास नकार दिला. लोक जे पाठीमागे बोलतात त्याच्याकडे मी त्यावेळी इतकं लक्ष द्यायला नको होतं. मी श्रीदेवीची मुलगी आहे तर त्यात मी काय करु शकत नाही. ती भारताची टॉप अभिनेत्री होती. जर मी त्यावेळी आईला सेटवर येऊन दिलं असतं तर, मी तिच्याकडून काही टिप्स घेतल्या असत्या. अनेकदा फिल्मच्या सेटवर वाटायचं की आईला फोन करुन तिला सेटवर बोलावून घ्यावं. परंतु त्यावेळी मी लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं." अशाप्रकारे जान्हवी कपूरने तिला झालेला पश्चाताप भावुक शब्दांमध्ये व्यक्त केला.