“दिवाळीला माझी आई…”, अभिनेत्री जान्हवी कपूरने सांगितल्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 11:03 AM2023-11-12T11:03:20+5:302023-11-12T11:04:38+5:30
बोनी कपूर व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरने दिवाळीनिमित्त आई श्रीदेवीच्या आठवणी सांगितल्या
दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात दिवाळीची धामधुम पाहायला मिळत आहे. बोनी कपूर व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरने दिवाळीनिमित्त आई श्रीदेवीच्या आठवणी सांगितल्या. त्याबरोबरच दरवर्षी श्रीदेवी कशाप्रकारे दिवाळी साजरी करायच्या, याबद्दलही तिने भाष्य केले आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले, 'आई खूप धार्मिक होती. या सर्व परंपरांममुळे आणि पुजा केल्याने मला ती माझ्या अगदी जवळ असल्याचे वाटते. परंपरा या आमच्या कुटुंबाचा आणि माझ्या बालपणाचा मोठा भाग आहेत'.
पुढे ती म्हणाली, 'माझ्या कुटुंबात दिवाळीचा सण अगदी धुमधडाक्यात साजरा होतो. कार्यालयात आणि घरी पूजा केली जाते. दिवाळीची माझी सर्वांत आवडती आठवण म्हणजे, माझ्या आजीच्या घरी दिवाळीचे जेवण असायचे. तेव्हा संपुर्ण घर दिव्यांनी सजवलं जायचं. सर्व जण कपडे घालून तयार व्हायचो. तेव्हा खूप चांगला वेळ जायचा. आपला भारतीय वारसा, परंपरा आणि संस्कृती नेहमीच आपल्या जीवनाचा एक मोठा भाग आहेत'.
जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती 'मिस्टर अँड मिसेस माही' या आगामी स्पोर्ट्स कॉमेडीमध्ये दिसणार आहे. शिवाय, जान्हवी कपूर लवकरच 'देवरा' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तर श्रीदेवी यांचं निधन 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत झालं. त्या 54 वर्षांच्या होत्या. भाचा मोहीत मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी त्या दुबईला गेल्या होत्या. यादरम्यान बाथटबमध्ये बुडून त्यांचा निधन झालं होतं.आईच्या निधनानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर पूर्णपणे खचली होती.