जान्हवी कपूरला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती; याला अंधश्रद्धा म्हणाल की आणखी काही?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 01:00 PM2019-06-21T13:00:34+5:302019-06-21T13:04:13+5:30

नवा चित्रपट येणार म्हटल्यावर स्टार्स भरभरून बोलतात. नको इतके प्रमोशन करतात. पण जान्हवी तोंड उघडायला तयार नाही. याचे कारण म्हणजे, तिला वाटत असलेली भीती.

Janhvi Kapoor on RoohiAfza: Will not speak much about the film, can catch evil's eye | जान्हवी कपूरला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती; याला अंधश्रद्धा म्हणाल की आणखी काही?

जान्हवी कपूरला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती; याला अंधश्रद्धा म्हणाल की आणखी काही?

googlenewsNext
ठळक मुद्दे२० मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणा-या या चित्रपटात जान्हवी डबल रोलमध्ये दिसणार, असे कळतेय. रूही आणि अफसाना अशा दोन भूमिका ती वठवणार आहे.

जान्हवी कपूर सध्या काय करतेय? तर ‘रूहअफ्जा’ या चित्रपटात बिझी आहे. पण तूर्तास जान्हवी आपल्या या आगामी चित्रपटाबद्दल काहीही बोलायला तयार नाही. खरे तर नवा चित्रपट येणार म्हटल्यावर स्टार्स भरभरून बोलतात. नको इतके प्रमोशन करतात. पण जान्हवी ‘रूहअफ्जा’बद्दल तोंड उघडायला तयार नाही. याचे कारण म्हणजे, तिला वाटत असलेली भीती. होय, फार बोलले तर माझ्या चित्रपटाला त्याला दृष्ट लागेल, असे तिचे म्हणणे आहे.


आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. अलीकडे ग्राजिया मिलेनियल अवार्ड्समध्ये जान्हवीला तिच्या या आगामी चित्रपटाबद्दल विचारण्यात आले. यावर जान्हवी जे काही बोलली, ते ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ‘चित्रपटाचे शूटींग चांगल्या प्रकारे सुरु आहे. पण मी त्याबद्दल फार काही बोलणार नाही. तुम्ही मला अंधश्रद्धाळू म्हणा किंवा आणखी काही, पण मी खूप काही बोलले तर माझ्या चित्रपटाला दृष्ट लागेल, असे मला वाटते. त्यामुळे मी या चित्रपटाबद्दल फार काही सांगणार नाही. या चित्रपटाचा भाग बनण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते, एवढेच मी सांगेल,’ असे जान्हवी यावेळी म्हणाली.


एकंदर काय तर ‘रूहअफ्जा’ला लोकांची दृष्ट लागेल, असे जान्हवीला वाटते आहे. आता याला अंधश्रद्धा म्हणायचे की आणखी काही, हे तुम्हीच ठरवा.
‘रूहअफ्जा’ या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव लीड रोलमध्ये आहे. दिनेश विजान व मृगदीप सिंह निर्मित हा चित्रपट हार्दिक मेहता दिग्दर्शित करतोय. २० मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणा-या या चित्रपटात जान्हवी डबल रोलमध्ये दिसणार, असे कळतेय. रूही आणि अफसाना अशा दोन भूमिका ती वठवणार आहे.

Web Title: Janhvi Kapoor on RoohiAfza: Will not speak much about the film, can catch evil's eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.