Jr NTR सोबत ऑनस्क्रीन रोमान्स करेल ही बॉलिवूड अभिनेत्री, तरूणांमध्ये आहे तिची मोठी क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:52 AM2022-01-31T11:52:38+5:302022-01-31T11:55:33+5:30

Janhavi Kapoor to romance with Jr NTR: ज्यूनिअर एनटीआर आता प्रसिद्ध दिग्दर्शक बुची बाबूच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सिनेमाची स्क्रीप्ट फायनल झाली आहे.

Janhvi Kapoor to romance with Jr NTR in his next south movie | Jr NTR सोबत ऑनस्क्रीन रोमान्स करेल ही बॉलिवूड अभिनेत्री, तरूणांमध्ये आहे तिची मोठी क्रेझ

Jr NTR सोबत ऑनस्क्रीन रोमान्स करेल ही बॉलिवूड अभिनेत्री, तरूणांमध्ये आहे तिची मोठी क्रेझ

googlenewsNext

Janhavi Kapoor to romance with Jr NTR: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR) सध्या त्याच्या आगामी 'RRR' मुळे चांगलाच चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. अशातच त्याच्या आगामी सिनेमाचीही चर्चा सुरू झाली आहे. ज्यूनिअर एनटीआर आता प्रसिद्ध दिग्दर्शक बुची बाबूच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सिनेमाची स्क्रीप्ट फायनल झाली आहे. सोबतच आता मेकर्स एका मुख्य अभिनेत्रीच्या शोधात आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्यूनिअर एनटीआर हा सिनेमा पॅन इंडिया स्तरावर तयार करण्याच्या तयारीत आहे. असं मानलं जात आहे की, RRR नंतर ज्यूनिअर एनटीआर पुढील पॅन इंडिया स्टार म्हणून समोर येणार आहे. त्यामुळे दिग्दर्शकाला या सिनेमात एका बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री हवी आहे. ज्यासाठी मेकर्सनी अभिनेत्री जान्हवी कपूरची निवड केली आहे. मेकर्सचं मत आहे की, सिनेमात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारण्यासाठी जान्हवी कपूर एकदम परफेक्ट आहे. पण जान्हवीने या सिनेमाला होकार दिला की नाही हे समोर आलेलं नाही. चर्चा आहे की, मेकर्स तिला घेऊनच सिनेमा करणार आहेत.

जान्हवीच्या करिअरबाबत सांगायचं तर ती गेल्यावर्षी 'गुंजन सक्सेना' आणि 'रूही'सारख्या सिनेमात दिसली आहे. या सिनेमांसोबतच ती 'दोस्ताना २', 'गुड लक जेरी' आणि 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही'सारख्या सिनेमांमध्ये बिझी आहे. जान्हवी कपूरच्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील डेब्यूची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण अजून कोणत्याही प्रोजेक्टची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चर्चा अशीही आहे की, जान्हवी अजित कुमार स्टारर आणि बोनी कपूरचं प्रॉडक्टशन असलेल्या  'वलिमे' सिनेमात दिसणार आहे.
 

Web Title: Janhvi Kapoor to romance with Jr NTR in his next south movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.