जान्हवी कपूर झाली बिझी! पापा बोनी कपूर यांच्यासाठीही नाही वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 08:38 PM2018-09-18T20:38:32+5:302018-09-18T20:40:14+5:30
होय, जान्हवी सध्या जाम बिझी आहे. इतकी की, वडील बोनी कपूर यांच्यासाठीही तिला वेळ नाही.
श्रीदेवींच्या निधनानंतर करण जोहर खऱ्या अर्थाने जान्हवी कपूरचा मेंटॉर बनला आहे. करणच्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीचा ग्रँड डेब्यू झाला आणि जान्हवी करणच्या ‘आवडत्या स्टार्स’च्या यादीत जावून बसली. त्याचमुळे ‘धडक’नंतर करणने जान्हवीला ‘तख्त’साठी साईन केले. याशिवाय धर्मा प्रॉडक्शनच्याच आणखी एका चित्रपटातही जान्हवीची वर्णी लागल्याची खबर आहे. होय,ताजी बातमी मानाल तर करणच्या या चित्रपटात जान्हवी इंडियन एअर फोर्सची पहिली महिला चॉपर पायलट गुंजन सक्सेनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. कारगिल युद्धादरम्यान गुंजनने आपल्या जीवाची बाजी लावत अनेक जवानांचा जीव वाचवला होता. शत्रूने गुंजनच्या विमानाला चहूबाजूंनी घेरल्यानंतरही तिने अनेक भारतीय सैनिकांना जीवदान दिले होते. गुंजनच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात जान्हवी लीड रोलमध्ये असल्याची चर्चा आहे. एकंदर काय तर जान्हवी सध्या जाम बिझी आहे. इतकी की, वडील बोनी कपूर यांच्यासाठीही तिला वेळ नाही.
सूत्रांचे मानाल तर बोनी कपूर जान्हवीसाठी एक चित्रपट प्रोड्यूस करणार होते. पण सध्या तरी जान्हवीला या चित्रपटासाठी अजिबात वेळ नाही. अर्थात बोनी कपूर यांना याबद्दल जराही दु:ख नाही. उलट लेकीच्या करिअरने गती घेतलेली पाहून ते आनंदात आहेत. करण जोहर इतका चांगला दुसरा कुणीच मेंटॉर जान्हवीला मिळाला नसता. तो अगदी स्वत:च्या मुलीसारखी जान्हवीची काळजी घेतो,असे बोनी अलीकडे एका मुलाखतीत म्हणाले होते.