श्रीदेवीच्या स्मृतीदिनी लेक जान्हवी कपूरने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, बॉयफ्रेंड शिखर पहाडियानेही दिली साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 18:11 IST2024-08-13T18:09:45+5:302024-08-13T18:11:40+5:30
जान्हवीच्या दाक्षिणात्य पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

श्रीदेवीच्या स्मृतीदिनी लेक जान्हवी कपूरने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, बॉयफ्रेंड शिखर पहाडियानेही दिली साथ
आज १३ ऑगस्ट अभिनेत्री श्रीदेवी यांचा स्मृतीदिन. यानिमित्त त्यांची लेक जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) दरवर्षी या दिवशी तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाते. यावेळीही ती बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत तिरुपतीला पोहोचली. ती कायम आपल्या वागण्यातून आईला आठवण्याचा प्रयत्न करते. आईला जे आवडायचं, ज्यावर तिचा प्रचंड विश्वास होता ते सगळं जान्हवी फॉलो करताना दिसते. गेल्या काही वर्षांपासून जान्हवीसोबत शिखरही आवर्जुन दिसतो.
जान्हवी कपूर यंदाही तिरुपतीला पोहोचली. तिने पिवळ्या रंगाची सिल्क साडी दाक्षिणात्य पद्धतीने नेसली आहे. तर सोन्याचे दागिने घातले आहेत. गळ्यात सुंदर हार, कानात झुमके आणि कमरपट्टा अशा भरजरी लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. जान्हवीने आईसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. यासोबत तिरुपती बालाजीच्या मंदिराच्या पायऱ्यांचाही फोटो आहे. तर तिने स्वत:चा सोलो फोटो शेअर करत लिहिले, 'हॅपी बर्थडे मम्मा, आय लव्ह यू'.
माध्यमांमध्ये व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये जान्हवी शिखरसोबत दिसत आहे. शिखर पांढरं धोतर, गळ्यात पांढरं वस्त्र घालून पारंपरिक लूकमध्ये पोहोचला आहे.
जान्हवी आणि शिखर अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या कठीण काळात शिखरने जान्हवीची आणि तिच्या कुटुंबाची साथ दिली. तो त्यांच्यासाठी कायम उभा होता. बोनी कपूर यांनी स्वत: त्याचं कौतुक केलं होतं. जान्हवीही सध्या शिखरच्या प्रेमात बुडाली आहे.