खरंच की काय ? राखी सावंतवर बनणार बायोपिक? जावेद अख्तर लिहीणार तिच्या आयुष्यावर कथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 15:30 IST2021-03-06T15:27:27+5:302021-03-06T15:30:25+5:30
Javed Akhtar Confirms Rakhi Sawant's Biopic :'बिग बॉस १४' मध्ये राखी सावंतचा प्रवास सर्वात रंजक राहिला. तिनं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आणि शोच्या अखेरीस तिला बिग बॉसनी एंटरटेनमेंट क्वीन म्हटलं होतं.

खरंच की काय ? राखी सावंतवर बनणार बायोपिक? जावेद अख्तर लिहीणार तिच्या आयुष्यावर कथा
बॉलीवुडमध्ये आजवर विविध बायोपिक आले. या बायोपिक सिनेमातून त्या त्या व्यक्तीचा जीवन संघर्ष रसिकांनी रुपेरी पडद्यावर पाहिला. या बायोपिक सिनेमांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. आता आणखी एक बहुप्रतिक्षित बायोपिक रसिकांच्या भेटीला येणार आहे. कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल राखी सावतंवर हा बायोपिक बनणार असल्याचे खुद्द जावेद अख्तर यांनीच सांगितले आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे यावर थोडा ब्रेक लागला होता. मात्र आता लवकरच राखीचा जीवनप्रवास चाहत्यांसमोर रुपेरी पडद्यावर उलगडणार असल्याचे म्हटले आहे. खुद्द जावेद अख्तर लिहीणार राखीच्या आयुष्यावर कथा लिहीणार असल्यामुळे राखीचाही आनंद द्विगुणित झाला आहे. खुद्द जावेद अख्तर यांनी तिच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यासाठी राखीला भेटण्यासाठी घरीही बोलावले होते. मात्र लॉकडाऊन लागले आणि राखीला जावेद अख्तर यांना भेटणे शक्य झाले नाही.
चार पाच वर्षापूर्वी विमानप्रवासात राखी सावंतची भेट जावेद अख्तर यांच्या झाली होती. त्या प्रवासादरम्यान राखीने तिचा संघर्ष जावेद अख्तर यांनाही सांगितला होता. त्याचवेळी जावेद अख्तर यांनी यावर बायोपिक बनवण्याचा विचार केला होता. त्याचवेळी त्यांनी राखीला यावर बायोपिक बनवणार असल्याचा शब्द दिला होता. अखेर राखीला दिलेला शब्द जावेद यांनीही पाळला आणि यावर लकरच काम सुरु होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आयटम गर्ल राखी सावंतचं जीवनाचं वास्तव रुपेरी पडद्यावर अनुभवण्यासाठी रसिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
'बिग बॉस १४' मध्ये राखी सावंतचा प्रवास सर्वात रंजक राहिला. तिनं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आणि शोच्या अखेरीस तिला बिग बॉसनी एंटरटेनमेंट क्वीन म्हटलं होतं. राखीनं या सीझनच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये तर स्वतःची जागा बनवली पण सीझनची विजेती मात्र ती होऊ शकली नाही. राखीनं दुसरा रस्ता निवडला आणि १४ लाखांची रक्कम असलेली बॅग घेऊन राखी या शोमधून बाहेर पडली होती.