कंगना रणौतला न्यायालयाचा दणका तर जावेद अख्तरांना दिलासा, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:30 IST2023-07-26T16:29:44+5:302023-07-26T16:30:30+5:30
जावेद अख्तर यांना ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

कंगना रणौतला न्यायालयाचा दणका तर जावेद अख्तरांना दिलासा, काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यात कायदेशीर लढाई चालू होती. या लढाईत आता कोर्टाने कंगनाला दणका दिला आहे. जावेद अख्तर यांना ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. पण सोबतच अख्तर यांना एक दिलासाही मिळाला आहे. मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचे आरोप फेटाळले आहेत.
कंगना रणौतने आपल्या याचिकेत जावेद अख्तर यांच्यावर आरोप लावले की मार्च २०१६ रोजी अख्तर यांनी कंगना आणि तिची बहीण रंगोलीला घरी बोलावले. ऋतिक रोशनची माफी माग असं अख्तर तिला म्हणाले होते. ही गोष्ट ह्रतिक आणि कंगना यांच्यात सार्वजनिक वाद सुरु होता तेव्हाची आहे. मंगळवारी कोर्टाने जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचा आणि इतर चार आरोप फेटाळून लावले.
न्यायालय म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीला लेखी माफी मागायला लावणे हे मौल्यवान संरक्षणाअंतर्गत येत नाही कारण कायदेशीर हक्क तयार केला जाऊ शकत नाही किंवा सोयीनुसार वाढवता येत नाही आणि तो ट्रान्सफॉर्मर देखील असू शकत नाही.'दंडाधिका-यांनी जावेद अख्तर यांना घाबरवून धमकावणे आणि महिलेच्या विनयशीलतेचा अपमान केल्याच्या आरोपाखाली समन्स जारी केले. त्यांना ५ ऑगस्ट रोजी अंधेरी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.