कधी कधी चांगुलपणाही त्रासदायक ठरतो! जावेद अख्तर यांनी केली राजकुमार हिरानींची पाठराखण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 10:05 AM2019-01-17T10:05:36+5:302019-01-17T10:12:24+5:30
अर्शद वारसी, दिया मिर्झा आणि शरमन जोशी यांनी हिरानींच्या बाजूने मैदानात उडी घेतली. आता या यादीत प्रसिद्ध लेखक व गीतकार जावेद अख्तर यांचे नावही सामील झाले आहे
‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या बाजूने बॉलिवूडचे अनेक दिग्गज मैदानात उतरलेले दिसत आहेत. होय, अर्शद वारसी, दिया मिर्झा आणि शरमन जोशी यांनी हिरानींच्या बाजूने मैदानात उडी घेतली. आता या यादीत प्रसिद्ध लेखक व गीतकार जावेद अख्तर यांचे नावही सामील झाले आहे. जावेद यांनी हिरानींचा बचाव करणारे ट्वीट केले आहे.
I had come to the film industry in 1965. After so many years if I am asked who are the most decent people you met in this industry over almost 5 decades, perhaps the first name that will come to my mind is RAJU HIRANI. G.B Shaw has said . “ it is too dangerous to be too good”
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 16, 2019
‘हिरानी हे फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक शालीन व्यक्तिमत्त्व आहे. मी १९६५ मध्ये फिल्म इंडस्ट्रीत आलो. तेव्हापासून तर आत्तापर्यंतच्या इतक्या वर्षांत इंडस्ट्रीतील सर्वांत सभ्य व शालीन व्यक्ति कोण, असे मला विचारले तर माझ्या डोक्यात पहिले नाव राजू हिरानी यांचेच येईल. जी. बी. शॉने म्हटले आहेच की, जास्त चांगुलपणाच जास्त धोकादायक ठरतो, ’अशा शब्दांत जावेद यांनी हिरानींची पाठराखण केली आहे.
जावेद अख्तर यांच्या पाठोपाठ ‘संजू’ चित्रपटात काम करणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना हिनेही हिरानी यांची बाजू घेतली आहे. हिरानींवर लागलेल्या आरोपांमुळे मी उदास आहे. हे आरोप बालिश आहेत. मी असा विचारही करू शकत नाही. मी त्यांच्यासोबत काम केलेय आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शानदार राहिला आहे, असे करिश्माने म्हटले आहे.
#IStandforRajuHiranipic.twitter.com/ZrM8T9xcpU
— Sharman Joshi (@TheSharmanJoshi) January 14, 2019
हिरानी यांच्यासोबत सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाºया एका महिलेने हिरानी यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. पीडित महिलेने हिरानींच्या अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘संजू’या चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे. हिरानी यांनी गत ६ महिन्यात (मार्च ते सप्टेंबर २०१८) अनेकदा आपले लैंगिक शोषण केल्याची व्यथा पीडित महिलेने मांडली आहे ‘संजू’च्या निर्मितीनंतर हा संपूर्ण प्रकार घडल्याचे तिने सांगितले. अलीकडे या आरोपानंतर हिरानी यांनी एक स्टेटमेंट जारी करत, या आरोपांचा इन्कार केला. हा सगळा माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन महिन्यांपूर्वी माझ्यावर असे आरोप झाल्याचे मला कळले आणि मला धक्का बसला. हे सगळे प्रकरण कुठल्या लीगल बॉडीकडे वा कमेटीकडे नेण्याचा विचार मी केला असतानाच याप्रकरणात मीडियाची मदत घेतली गेली. पण हे आरोप मला मान्य नाहीत. या आरोपांचे मी खंडन करतो. हे सगळे आरोप एका कटाचा भाग आहेत आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न आहेत, असे हिरानींनी म्हटले आहे.
काय आहेत आरोप
राजकुमार हिरानी यांनी ९ एप्रिल २०१८ ला अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी आणि कार्यालयात माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्याकडे गप्प राहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. जेव्हापर्यंत मी शांत राहू शकत होते, तोपर्यंत गप्प बसले. कारण त्यावेळी मला नोकरी टिकवायची होती. मी त्यावेळी काही बोलले असते, तर माझे काम वाईट आहे, असे हिरानी यांनी सर्वांना सांगितले असते. त्यामुळे माझे भविष्य उद्ध्वस्त झाले असते, अशी व्यथा पीडितेने मेलमधून मांडली आहे.