हे ढोंग कशासाठी? ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या निर्मात्यांवर पुन्हा भडकले जावेद अख्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 01:10 PM2019-04-05T13:10:08+5:302019-04-05T13:11:20+5:30
‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाला आणि हा चित्रपट वादात अडकला. सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनीही या वादात उडी घेतली. आता जावेद अख्तर पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणावर जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.
‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाला आणि हा चित्रपट वादात अडकला. सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनीही या वादात उडी घेतली. ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या पोस्टरवर स्वत:चे नाव पाहून जावेद अख्तर यांना चांगलाच धक्का बसला होता. या चित्रपटाचे एकही गाणे मी लिहिलेले नाही. मग माझे नाव का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. पुढे बायोपिकचे निर्माते संदीप एस. सिंग यांनी याबाबत खुलासा केला होता.आम्ही या चित्रपटात 1947: अर्थ या चित्रपटातील ‘ईश्वर अल्ला’ आणि ‘दस’ या चित्रपटातील ‘सुनो गौर से’ ही दोन गाणी घेतली आहेत. त्याचमुळे या गाण्याचे गीतकार जावेद अख्तर आणि समीर यांची नावे या पोस्टरमध्ये टाकण्यात आली आहेत, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले होते. पण जावेद अख्तर यांना हा खुलासा जराही पटला नव्हता. आता जावेद अख्तर पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणावर जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.
10 million + views, trending no.1 on YouTube, thank you to each and every one of you for the love. I am truly humbled 🙏 Jai Hind 🇮🇳 #PMNarendraModiTrailerhttps://t.co/Yk3qkIhiRz@sureshoberoi@anandpandit63@sandip_Ssingh@OmungKumar
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) March 22, 2019
Am shocked to find my name on the poster of this film. Have not written any songs for it ! pic.twitter.com/tIeg2vMpVG
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 22, 2019
एका ताज्या मुलाखतीत जावेद अख्तर या प्रकरणावर बोलले. ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या निर्मात्यांनी माझ्या जुन्या गाण्याचा रिमेक बनवणे आणि त्याला माझे नाव देणे, हे कदापि योग्य नाही. ही मुळातच फसवणूक आहे. जुन्या गाण्यांचे हक्क खरेदी करणे आणि ते नव्याने रिक्रिएट करून वापरणे, हा प्रकार वाढतोय आणि तो चुकीचा आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या निर्मात्यांनी टी-सीरिजकडून ‘ईश्वर अल्लाह’चे अधिकार खरेदी केले आणि ते नव्याने रेकॉर्ड केले आणि क्रेडिटमध्ये माझे नाव दिले. मला क्रेडिट द्यायचे होते तर तुम्ही या गाण्याचे संगीतकार ए. आर. रहेमान यांना क्रेडिट का दिले नाही? त्यांना का बाजूला फेकले? हे ढोंग कशासाठी? असा सवाल जावेद अख्तर यांनी यावेळी केला.
‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट येत्या १२ एप्रिलला रिलीज होतोय. अभिनेता विवेक ओबेरॉय यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा साकारतोय.