जावेद अख्तर यांचं 'ते' लोकप्रिय गाणं, म्हणाले, "दारुच्या नशेत १० मिनिटांत लिहून पूर्ण केलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 03:12 PM2023-06-14T15:12:03+5:302023-06-14T15:13:02+5:30

जावेद अख्तर यांनी त्यांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणं चक्क दारुच्या नशेत लिहिलं होतं.

javed akhtar wrote a famous song tumko dekha to ye khayal aya in just 10 minutes while drunk | जावेद अख्तर यांचं 'ते' लोकप्रिय गाणं, म्हणाले, "दारुच्या नशेत १० मिनिटांत लिहून पूर्ण केलं"

जावेद अख्तर यांचं 'ते' लोकप्रिय गाणं, म्हणाले, "दारुच्या नशेत १० मिनिटांत लिहून पूर्ण केलं"

जावेद अख्तर (Javed Akhtar)  बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध लेखक तसंच गीतकारही आहेत. 'संदेसे आते है', 'दो पल', 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' अशी अनेक सुप्रसिद्ध गाणी लिहिली आहेत. ज्या गाण्यांना आजची पिढी ही ऐकणं पसंत करते. जावेद अख्तर यांनी त्यांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणं चक्क दारुच्या नशेत लिहिलं होतं. कोणतं होतं ते गाणं याचा खुलासा त्यांनी स्वत:च केला आहे. 

नुकतेच कोलकत्याच्या एफआयसीसीआयच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. तेव्हा ते म्हणाले, 'मी काही गाणी १० मिनिटांच्या आत लिहिली आहेत. सिलसिला सिनेमानंतर यश चोप्रा यांचा असिस्टंट माझ्याकडे आला आणि म्हणाला की सर मी एक छोटी फिल्म करत आहे. त्यासाठी तुम्ही गाणी लिहावी अशी माझी इच्छा आहे. पण माझ्याजवळ तुम्हाला द्यायला काहीच नाहीए. तेव्हा मी त्याला म्हणलं ठिके मी लिहिन.'

ते पुढे म्हणाले, 'मी मोफत काम करत होतो. मी सर्व गाणी तर लिहिली पण एक गाणं अर्धवटच राहिलं. तो बिचारा रोज संध्याकाळी माझ्याकडे गाण्याबद्दल विचारणा करायचा. त्यावेळी मी दारु प्यायचो. मला रोज संध्याकाळी गप्पा मारत मारत पिण्याची सवय होती. यातच रात्रीचे दिड दोन वाजायचे.मग मी ठरवायचो आता हे गाणं उद्याच पूर्ण करु.'

दारु पित ९ मिनिटांत लिहिलं गाणं 

जावेद अख्तर सांगतात, 'तो बिचारा बरेच दिवस रोज माझ्याकडे यायचा गाणी तयार आहेत का विचारायला. एका रात्री मी ८ ते ९ पेग घेतल्यानंतर मी मी पेन आणि पेपर मागवला. मी ९ मिनिटांत गाणं लिहिलं होतं कारण त्याला शेवटची ट्रेन पकडायची होती. तो सारखी वेळ बघत होता. मग मी ९ मिनिटांत गाणं लिहून त्याला दिलं. ते गाणं जगजित सिंग यांनी गायलं होतं. ते गाणं होतं 'तुमको देखा तो ये ख्याल आया'.

'तुमको देखा तो ये ख्याल आया' हे गाणं त्यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास लिहिलं होतं. 'साथ साथ' सिनेमातील हे गाणं आहे ज्यात दीप्ती नवल आणि फारुख शेख यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 1982 साली रिलीज झाला होता. 

Web Title: javed akhtar wrote a famous song tumko dekha to ye khayal aya in just 10 minutes while drunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.