Jawaani Jaaneman Trailer अम्मी का बेटा गे है ! डायलॉगवर नेटक-यांनी साधला निशाणा, युजर्स म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 16:52 IST2020-01-10T16:51:18+5:302020-01-10T16:52:40+5:30
Jawaani Jaaneman Movie : या सिनेमाचे दिग्दर्शन नितिन कक्कड करतोय. यात सैफ 40 वर्षांच्या व्यक्तिची भूमिका साकारणार आहे.

Jawaani Jaaneman Trailer अम्मी का बेटा गे है ! डायलॉगवर नेटक-यांनी साधला निशाणा, युजर्स म्हणाले
लवकरच रूपेरी पडद्यावर सैफ अली खान आणि तब्बूचा आगामी सिनेमा 'जवानी जानेमन' रसिकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये सैफ अली खान आणि तब्बू यांच्यात मजेदार केमेस्ट्री दिसत आहे. विशेष म्हणजे सिनेमात पूजा बेदीची मुलगी आलिया दिसणार आहे. आलिया या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. 'जवानी जानेमन' या सिनेमात आलिया सैफच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीलाच अम्मी का बेटा गे है, असे फरिदा जलाल म्हणतात. त्यावरून हा सिनेमा कॉमेडी असल्याचे कळत आहे. सिनेमात डबल मिनिंगच्या डायलॉगचा भडिमार असल्याचे यावरून स्पष्ट होते.
या ट्रेलरमध्ये सैफचा एक वेगळाच स्वॅग यात दिसत आहे. मात्र जेव्हा त्याच्या 21 वर्षांची मुलगी समोर येते तेव्हा त्याच्या आयुष्यात एक ट्विस्ट येतो. या सिनेमात तब्बू सैफ अली खानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे, जरी ती बर्याच वर्षांपासून त्याच्यापासून दूर राहत होती. पण त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी दोघांची मुलगी घेते. त्यानंतर यांच्या आयुष्यात घडणा-या मेजशीर गोष्टींवर सिनेमा आधारित आहे. जवानी जानमेन सिनेमाची निर्मिती जॅकी भगनानी करतो आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नितिन कक्कड करतोय. यात सैफ 40 वर्षांच्या व्यक्तिची भूमिका साकारणार आहे.