दीपिका पादुकोण, नयनताराच्या 'जवान'मध्ये आणखी एका अभिनेत्रीची धमाकेदार एंट्री, शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 05:43 PM2023-07-13T17:43:22+5:302023-07-13T17:47:11+5:30

'जवान'मध्ये शाहरुख खानशिवाय अभिनेत्री नयनतारा, सान्या मल्होत्रा ​​आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत. आता आणखी एका अभिनेत्रीची धमाकेदार एंट्री झाली आहे.

Jawan kiara advani has special cameo in shah rukh khan and nayanthara film | दीपिका पादुकोण, नयनताराच्या 'जवान'मध्ये आणखी एका अभिनेत्रीची धमाकेदार एंट्री, शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करणार

दीपिका पादुकोण, नयनताराच्या 'जवान'मध्ये आणखी एका अभिनेत्रीची धमाकेदार एंट्री, शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करणार

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड 'जवान' चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलीज झाला आहे. अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान पुन्हा एकदा अ‍ॅक्शनचा धडाका लावताना दिसत आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय अभिनेत्री नयनतारा, सान्या मल्होत्रा ​​आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर 'जवान'मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय कॅमिओ भूमिकेत आहेत. रिपोर्टनुसार  दीपिका आणि थलपथी विजय व्यतिरिक्त आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री या चित्रपटात कॅमिओ असणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री कियारा अडवाणी 'जवान'च्या एका खास गाण्यात दिसणार आहे. या गाण्यात कियारा अभिनेता शाहरुख खानसोबत रोमान्स करणार आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्ड वाईडमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, या खास गाण्याचे शूटिंग चार दिवस चालणार आहे. यासोबतच यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये या आठवड्यापासून गाण्याचे शूटिंग सुरू होणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. 'जवान' बद्दल बातमी आली होती की शाहरुख खान आणि नयनतारा यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये राजा कुमारने गायलेले गाणे पुन्हा शूट करत आहेत.


शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर चित्रपट 'जवान' 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. शाहरुख खान आणि नयनतारा व्यतिरिक्त, या मल्टीस्टारर चित्रपटात विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, थलपथी विजय, कियारा अडवाणी, रिद्धी डोगरा आणि प्रिया मणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुख खान वेगवेगळ्या रुपात दिसणार आहे, कधी पोलीस अधिकारी तर कधी खलनायकाच्या रुपात चाहत्यांच्या मनोरंजनासाठी. 'जवान'चा प्रिव्ह्यू सोमवारी रिलीज झाला, ज्यामध्ये शाहरुख खानची दमदार स्टाईल पाहून चाहते खूश झाले. हा प्रिव्ह्यू रिलीज झाल्यानंतर 'जवान'बद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.


 

Web Title: Jawan kiara advani has special cameo in shah rukh khan and nayanthara film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.