'जवान'मधील 'नॉट रमैय्या वस्तावैया' गाणे प्रेक्षकांच्या भेटीस; शाहरुख आणि नयनतारा यांचा रोमँटिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 04:22 PM2023-08-29T16:22:10+5:302023-08-29T16:24:08+5:30

‘जवान’ सिनेमातील नॉट रमैय्या वस्तावैया हे गाणे रिलीज झाले आहे.

Jawan Song Not Ramaiya Vastavaiya Song Out | 'जवान'मधील 'नॉट रमैय्या वस्तावैया' गाणे प्रेक्षकांच्या भेटीस; शाहरुख आणि नयनतारा यांचा रोमँटिक अंदाज

Shah Rukh Khan

googlenewsNext

किंग खान अर्थात अभिनेता शाहरुखचा ‘जवान’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील नॉट रमैय्या वस्तावैया हे गाणे रिलीज झाले आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेमध्ये आता आणखीनच भर पडली आहे.  या गाण्यात शाहरुख आणि नयनतारा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे.

अनिरुद्ध रविचंदर, विशाल ददलानी आणि शिल्पा राव यांनी 'नॉट रमैया वस्तावैया' हे गाणं गायलं आहे. या गाण्यात शाहरुख विविध गेटअपमध्ये नाचताना दिसतोय.   नॉट रमैय्या वस्तावैया या गाण्यापूर्वी या सिनेमातील जिंदा बंदा आणि चलेया ही गाणी प्रदर्शित झाली आहेत.

Jawan ka jashn main aapke saath na manau yeh ho nahin sakta. Aa raha hoon main Burj Khalifa on 31st August at 9 PM and celebrate JAWAN with me. And since love is the most beautiful feeling in the world, toh pyaar ke rang mein rang jao and lets wear red...what say? READYYYY! pic.twitter.com/IUi4AkGrZy— Shah Rukh Khan (@iamsrk) August 28, 2023

'जवान' या सिनेमाचा ट्रेलर  31 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जवान'चा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

 जवानमध्ये शाहरुखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच या सिनेमात विजय सेतुपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा,दीपिका पदुकोण देखील झळकणार आहेत. हा सिनेमा  7 सप्टेंबर रोजी तामिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुखच्या या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये किंग खानच्या जवानचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झालं आहे.

Web Title: Jawan Song Not Ramaiya Vastavaiya Song Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.