Jaya Bachchan Birthday Special : ४५ वर्षांत इतकी बदलली बॉलिवूडची ‘गुड्डी’! १५ व्या वर्षी केला होता डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:22 AM2019-04-09T11:22:28+5:302019-04-09T11:23:13+5:30
बॉलिवूडमध्ये तब्बल चार दशकांचा काळ गाजवणाºया अभिनेत्री जया बच्चन या आज (९ एप्रिल) आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जया बच्चन यांनी वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही.
बॉलिवूडमध्ये तब्बल चार दशकांचा काळ गाजवणाºया अभिनेत्री जया बच्चन या आज (९ एप्रिल) आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जया बच्चन यांनी वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. पाठीवर रूळणारे लांबसडक केस आणि हसण्याचा एक वेगळा अंदाज यामुळे त्यांनी पे्रक्षकांना त्यांनी भुरळ घातली. १९७१ मध्ये जया बच्चन यांचा ‘गुड्डी’ हा सिनेमा हिट झाला आणि यानंतर एकामागून एक अनेक सिनेमे केले. पुढे त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. या इतक्या वर्षांत जया बच्चन यांच्यामध्ये प्रचंड बदल झाला.
जया बच्चन यांचा पहिला चित्रपट बंगाली होता. या चित्रपटाचे नाव होते, ‘महानगर’. यावेळी जया केवळ १५ वर्षांच्या होत्या. त्यांचा हा फोटो याच चित्रपटातला आहे.
‘महानगर’नंतर जया बच्चन यांनी अनेक बंगाली चित्रपटांत काम केले. १९७१ मध्ये त्यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाचे नाव होते, ‘गुड्डी’. ‘गुड्डी’ सुपरडुपर हिट झाला आणि यानंतर जया मुंबईला शिफ्ट झाल्यात.
‘गुड्डी’ नंतर एक क्यूट मुलगी अशी जया बच्चन यांची इमेज बनली. जया बच्चन यांना ही इमेज तोडायची होती आणि यासाठी एका ग्लॅमरस रोलची प्रतीक्षा त्यांना होता. अखेर ‘जवानी दिवानी’ या चित्रपटाद्वारे त्यांना ही संधी मिळाली. या चित्रपटात जया एकदम ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या.
‘जवानी दिवानी’नंतर जया यांनी अनेक चित्रपटांत काम केले. यापैकी बहुतांश चित्रपट हिट झालेत. उपहार, पिया का घर, कोशीश, बावर्ची या चित्रपटांतील जया यांच्या लूकची प्रचंड चर्चा झाली.
जया यांनी अमिताभ यांच्यासोबत जंजीर, अभिमान, चुपके चुपके, शोले, सिलसिला असे अनेक चित्रपट केलेत. या सर्व चित्रपटात जया यांचे लूक प्रभावित करणारे होते. काळानुसार त्यात बदलही दिसला.
वय आणि काळ याचे भान ठेवून भूमिका स्वीकारणा-या अभिनेत्री म्हणून जया ओळखल्या जातात. कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, लागा चुनरी में दाग या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका बघता, जया यांनी वय आणि काळानुसार स्वीकारलेला बदल जाणवतो.
२००८ मध्ये प्रदर्शित ‘द्रोणा’ या चित्रपटानंतर जया यांनी हळूहळू चित्रपट करणे थांबवले. २०१६ मध्ये ‘की अॅण्ड का’ या चित्रपटात त्या कॅमिओ रोलमध्ये अखेरच्या दिसल्या.