'किती ते जुने विचार'; ऐश्वर्याचं कौतुक केल्यानंतरही जया बच्चन झाल्या ट्रोल, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 01:47 PM2023-07-19T13:47:24+5:302023-07-19T13:47:57+5:30

Jaya bachchan:  व्हायरल होत असलेला व्हिडीओ करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचा आहे. या कार्यक्रमात जया बच्चन ऐश्वर्याविषयी बोलताना दिसत आहेत.

jaya bachchan talks about daughter in law aishwarya rai netizens call her regressive mother in law in viral video | 'किती ते जुने विचार'; ऐश्वर्याचं कौतुक केल्यानंतरही जया बच्चन झाल्या ट्रोल, कारण...

'किती ते जुने विचार'; ऐश्वर्याचं कौतुक केल्यानंतरही जया बच्चन झाल्या ट्रोल, कारण...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन (jaya bachchan) सध्या त्यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम काहानी' या सिनेमामुळे चर्चेत येत आहेत. या सिनेमामध्ये त्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमात त्यांनी ज्या पद्धतीची भूमिका साकारली आहे. त्याच्या कित्येक पटीने त्या खऱ्या आयुष्यात वेगळ्या आहेत. त्यांना खऱ्या आयुष्यात लोकांमध्ये फारसं मिसळायला आवडत नाही. इतकंच नाही तर लहान-लहान गोष्टींमुळेही त्यांच्या रागाचा पारा चढलेला दिसतो. त्यामुळेच त्यांच्या या स्वभावामुळे त्यांचं आणि ऐश्वर्याचं फारसं पटत नसेल असं लोकांना वाटतं. मात्र, प्रत्यक्षात तसं अजिबात नाहीये. सध्या सोशल मीडियावर जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात त्या ऐश्वर्याचं कौतुक करत आहेत.

 व्हायरल होत असलेला व्हिडीओ करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचा आहे. या कार्यक्रमात जया बच्चन ऐश्वर्याविषयी बोलताना दिसत आहेत. अभिषेकने केवळ पत्नी म्हणून नव्हे तर एक सून म्हणून सुद्धा योग्य निवड केली असं त्यांनी यात म्हटलं आहे.

"ती स्वत: एवढी मोठी कलाकार आहे. यशस्वी आहे पण तरी सुद्धा जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो त्यावेळी ती कायम मागे असते. कधीच मोठेपणा करत पुढे पुढे जात नाही. मला तिचा हाच गुण आवडतो. ती ज्या पद्धतीने मोठ्यांना मान देते ते मला खूप आवडतं. ती शांत आहे, सांगितलेलं सगळं ऐकते, ती फार समजूतदार आहे", असं जया बच्चन म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "आणि तिचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती आमच्या वातावरणात एकदम फिट झाली. हे एक कुटुंब आहे, हा मित्र परिवार आहे त्यामुळे कोणाशी कसं वागावं हे तिला बरोबर कळतं. आणि, ती या जबाबदाऱ्याही नीट पार पाडते."

दरम्यान, ऐश्वर्याचं कौतुक केल्यामुळे अनेकांनी जया बच्चनचं कौतुक केलं. तर, काही जणांनी तिला ट्रोलही केलं आहे. 'किती जुन्या विचारांची सासू आहेस', असं एकाने म्हटलं आहे. तर, 'एवढे श्रीमंत असूनही अडाणी आहेत', असंही एकाने म्हटलं आहे. इतकंच नाही तर, तिची क्षमता असूनही तुम्ही तिला सगळ्यांच्या मागे रहायला सांगता हे चुकीचं आहे, आदर्श सूनेच्या नावाखाली तिला कमीपणा देता का? असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांनी त्यांना विचारले आहेत.
 

Web Title: jaya bachchan talks about daughter in law aishwarya rai netizens call her regressive mother in law in viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.