जया बच्चन यांनी नातीच्या 'व्हॉट द हेल नव्या' या शोमध्ये ट्रोल करणाऱ्यांना दिलं ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 03:21 PM2024-02-29T15:21:12+5:302024-02-29T15:22:30+5:30

'व्हॉट द हेल नव्या' सीझन २ च्या नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे.

Jaya Bachchan throws an open challenge to trolls: 'If you are actually brave, then comment on actual issues and show your face | जया बच्चन यांनी नातीच्या 'व्हॉट द हेल नव्या' या शोमध्ये ट्रोल करणाऱ्यांना दिलं ओपन चॅलेंज

जया बच्चन यांनी नातीच्या 'व्हॉट द हेल नव्या' या शोमध्ये ट्रोल करणाऱ्यांना दिलं ओपन चॅलेंज

ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) विविध मुद्द्यावर खुलेपणाने आपले मत व्यक्त करताना दिसतात. आक्रमक स्वभावामुळेही त्या कायम चर्चेत असतात. यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगला सामारे जावं लागतं. नुकतेच त्यांनी नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट शो 'व्हॉट द हेल नव्या'च्या सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी ट्रोलिंगवर भाष्य केलं. 

'व्हॉट द हेल नव्या' सीझन २ च्या नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये नव्या, जया बच्चन आणि श्वेता बच्चन विविध मुद्द्यांवर चर्चा करताना दिसून येत आहेत.  सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या ट्रोलिंगवर त्यांनी चर्चा केली. 'लोक सोशल मीडियावर मूर्खपणाचे लिखाण करतात आणि ज्या पोस्ट नकारात्मक असतात त्यांनाच जास्तीत जास्त व्ह्यूज आणि टिप्पण्या मिळतात, असे नव्या म्हणाली. यावर जया बच्चन म्हणाल्या की, 'तुम्हाला कमेंट करायची असेल तर सकारात्मक कमेंट करा. पण तसे केले जात नाही. कमेंटमध्ये लगेच निर्णय देऊन टाकतात'. 

नव्या नवेली नंदा म्हणते की, 'त्या लोकांना तुमच्यासमोर बसवले तर ते बोलू शकणार नाहीत, बरोबर ना? यावर जया बच्चन म्हणतात, 'बोलायची हिम्मत तरी होईल का? दम असेल तर समोर येऊन बोलून दाखवा' यावर नव्या हसते आणि पुढे म्हणते की, 'हो, तुमच्या समोर तर अजिबात होणारच नाही'. जया बच्चन पुढे मीम्सबद्दल म्हणाल्या की, मीम्सच्या माध्यमातून अगदी वाईटरित्या ट्रोल केलं जातं. 

जया यांचा परखडपणा, त्यांची स्पष्टपणे मतं मांडण्याची भूमिका आणि पापाराझ्झींना बिनधास्तपणे बोलण्याची सवय अनेकांना माहिती आहे. जया बच्चन यांची बोलण्याची शैली आजही सगळ्यांनाच प्रचंड आवडते. नव्याच्या पॉडकास्टच्या या एपिसोडबद्दल सोशल मीडियावर उत्सुकता वाढली आहे. सध्या त्याचीच चर्चा होत आहे.  बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही देखील आता बॉलीवूडमधील मोठी सेलिब्रेटी आहे. नव्या नवेलीच्या पोस्ट आणि तिचं पॉडकास्ट आणि तिची वक्तव्यं ही नेहमीच चर्चेत असतात. 

Web Title: Jaya Bachchan throws an open challenge to trolls: 'If you are actually brave, then comment on actual issues and show your face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.