'मागे व्हा, दूर जा माझ्यापासून...' मुलगी श्वेता बच्चनसोबत आलेल्या जया बच्चन पापाराझींना पाहताच भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 11:56 AM2023-04-22T11:56:17+5:302023-04-22T11:59:49+5:30
पापाराझींनी फोटो काढायला सुरुवात करताच जया यांनी त्यांच्यावर दम भरला.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांना पापाराझी फारसे आवडत नाहीत हे आता सर्वांनाच माहिती झालं आहे. फोटो काढताना त्या अनेकदा पापाराझींना फटकारताना दिसली आहे. जया बच्चन यांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. शुक्रवारी जया बच्चन यांनी पामेला चोप्राच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी चित्रपट निर्माता आदित्य चोप्राच्या मुंबईतील घरी पोहोचले. जया बच्चन त्या ठिकाणी पोहोचताच पापाराझींनी तिला घेरले आणि त्या संतापल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पापाराझींनी फोटो काढायला सुरुवात करताच जया यांनी त्यांना दम भरला. या व्हिडिओमध्ये जया बच्चन मुलगी श्वेतासोबत दिसत आहेत. जया पापाराझींना आपल्या कडक आवाजात अंतर राखण्याच्या सूचना देत आहेत. दुसर्या एका व्हिडिओमध्ये जया फोटोग्राफर्सना आमचे फोटो काढू नका, "आता खूप झाले, परत जा." असे सांगताना दिसत आहे, तर श्वेता शांतपणे त्यांच्या शेजारी उभी होती.
जया बच्चन यांचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना अजिबात आश्चर्य वाटत नाही. अनेक सोशल मीडिया यूजर्सनी म्हटलंय त्यांना फोटोग्राफर्सना पाहून त्या अनेकदा वैतागतात.
दरम्यान प्रसिद्ध फिल्ममेकर यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या पत्नी पामेला चोप्रा (Pamela Chopra) यांचं 20 एप्रिल रोजी त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. पामेला प्रसिद्ध गायिका होत्या. यशराज फिल्म्समध्ये त्यांनी अनेक गाण्यांना संगीत दिलं. याशिवाय त्यांनी लेखिका, ड्रेस डिझायनर, सहनिर्मात्या म्हणूनही काम पाहिलं. त्यांच्या पश्चात मुलगा आदित्य चोप्रा, सून राणी मुखर्जी आणि छोटा मुलगा उदय चोप्रा आहेत.बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी आदित्य चोप्रा यांच्या मुंबईतील घरी शोक व्यक्त केला. अमिताभ बच्चन आपला मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्यासोबत आदित्यचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते.