बच्चन परिवारावर जया प्रदा यांचा निशाणा, अमर सिंह यांच्यावरून विचारले प्रश्न...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 02:49 PM2020-09-18T14:49:52+5:302020-09-18T15:05:32+5:30
आता त्यांनी अमर सिंह यांच्यावरून बच्चन परिवाराला घेरलं आहे. जया यांनी खंत व्यक्त केली की, अमर सिंह यांच्या निधनानंतर बच्चन परिवाराने सोशल मीडियावर दोन ओळी लिहून औपचारिकता निभावली.
जया बच्चन यांच्या राज्यसभेतील ड्रग्सववरील वक्तव्यावरून जया प्रदा लागोपाठ त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. आधी जया प्रदा म्हणाल्या होत्या की, जया बच्चन या ड्रग्स प्रकरणावरून राजकारण करत आहेत. आता त्यांनी अमर सिंह यांच्यावरून बच्चन परिवाराला घेरलं आहे. जया यांनी खंत व्यक्त केली की, अमर सिंह यांच्या निधनानंतर बच्चन परिवाराने सोशल मीडियावर दोन ओळी लिहून औपचारिकता निभावली.
२ ओळी पुरेशा नाहीत...
जया प्रदा आजतकसोबत बोलताना म्हणाल्या की, अमर सिंह यांचं बच्चन परिवारासोबत जवळचं नातं होतं. त्यांच्यासाठी केवळ २ ओळी लिहून सोडून देणं पुरेसं नाही. अमर सिंह यांच्यासाठी बच्चन परिवाराकडे वेळ नव्हता? जया प्रदा यांनी अमर सिंह यांच्या उपचारावेळी बच्चन परिवाराकडून सपोर्ट न मिळण्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
काही दिवसांपूर्वी जया बच्चन म्हणाल्या होत्या की, ड्रग्स केसमध्ये संपूर्ण इंडस्ट्रीला टार्गेट करणं योग्य नाही. काही लोक असं करत आहेत. ज्या ताटात जेवण करतात, त्यालाच छिद्र पाडत आहेत. यावर जया प्रदा म्हणाल्या होत्या की, जयाजी यांनी त्यांच्या घरातून आवाज उठवला पाहिजे की, मी तरूणांना सांभाळणार. बच्चन परिवार जे बोलतात ते ऐकायला जग तयार असतं. जया प्रदा म्हणाल्या होत्या की, मला वाटतं की, त्या ड्रग्स प्रकरणावरून राजकारण करत आहेत.
जया प्रदा त्यावेळी म्हणाल्या होत्या की, सुशांतच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीतील ड्रग्स वापराचं जे प्रकरण समोर आलंय ते दु:खद आहे. कारण पंजाबपासून ते नेपाळपर्यंत ड्रग्सची तस्करी होत आहे. देशातील युवापिढी यात वाहवत जात आहे. ड्रग्सचा वापर फिल्म इंडस्ट्रीतील कुणी करत असेल किंवा समाजातील कोणताही वर्ग करत असेल तर ते रोखणं गरजेचं आहे.
काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?
चित्रपटसृष्टीला समाजमाध्यमांतून फटकारले जात आहे, कारण सरकारचा या मनोरंजन क्षेत्राला पाठिंबा नाही, असं सांगून जया बच्चन म्हणाल्या, काही मोजक्या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण चित्रपटसृष्टीला कलंक लावू शकत नाहीत. रवी किशन यांचे वक्तव्य हे सध्या देशाची बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि बेरोजगारी या विषयावरून जनतेचे लक्ष दूर करण्यासाठी आहे, असा आरोपही बच्चन यांनी केला.
तसेच या उद्योगात असे काही लोक आहेत जे सर्वाधिक कर भरतात. पण त्यांना त्रासही दिला जात आहे. चित्रपटसृष्टीसाठी अनेक आश्वासने दिली गेली परंतु ती कधीच पूर्ण झाली नाहीत. सरकारने मनोरंजन क्षेत्राच्या समर्थनात यावे. ही इंडस्टी नेहमी सरकारला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. सरकारची कोणतीही चांगली कामे असतील त्याचे आम्ही समर्थन करतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा फक्त बॉलिवूडचे लोक पैसे देतात असं जया बच्चन म्हणाल्या. त्याचसोबत सरकारने मनोरंजन क्षेत्राला मदत केली पाहिजे. काही वाईट लोकांमुळे आपण संपूर्ण बॉलिवूडची प्रतिमा खराब करू शकत नाही. सोमवारी लोकसभेत एका खासदाराने बॉलिवूडविषयी निवेदन दिले. जे स्वतः बॉलिवूड इंडस्ट्रीतील आहेत. हे लाजिरवाणे आहे. ज्या ताटात जेवतो त्यालाच छिद्र करतो हे चुकीचे आहे. उद्योगाला शासनाची साथ गरजेची असते असंही त्या म्हणाल्या होत्या.
हे पण वाचा :
जया बच्चन यांच्यावर भडकले 'शक्तिमान' मुकेश खन्ना, म्हणाले - ओरडू नका, शांत बसा...
बॉलिवूड अन् ड्रग्स प्रकरणात आता अभिनेत्री जया प्रदाची उडी; बच्चन कुटुंबीयांना दिलं थेट आव्हान
जया बच्चन- कंगना वादात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री, ट्रोलर्सला लगावला जोरदार टोला