वयाच्या साठीतही तोच सळसळता उत्साह; जयाप्रदाने केला मुझे 'नौलखा मंगा दे रे'वर जबरदस्त डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 14:53 IST2023-03-12T14:52:13+5:302023-03-12T14:53:00+5:30
Jaya prada: जयाप्रदा यांनी त्यांच्या काळात अभिनयासह उत्तम नृत्यशैलीमुळेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

वयाच्या साठीतही तोच सळसळता उत्साह; जयाप्रदाने केला मुझे 'नौलखा मंगा दे रे'वर जबरदस्त डान्स
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जयाप्रदा (jaya prada). बऱ्याच काळापासून जयाप्रदा रुपेरी पडद्यापासून दूर आहेत. जयाप्रदा यांनी त्यांच्या काळात अभिनयासह उत्तम नृत्यशैलीमुळेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. विशेष म्हणजे त्यांचा हाच उत्साह वयाच्या साठीमध्येही कायम आहे. अलिकडेच त्यांनी इंडियन आयडॉल १३च्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी बहारदारपणे डान्स केला.
सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर इंडियन आयडॉल १३ चा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये जयाप्रदा यांनी त्यांच्या 'मुझे नौलखा मंगा दे रे' या गाण्यावर ताल धरला. विशेष म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षीही त्यांचा सळसळता उत्साह पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, जयाप्रदा यांनी बॉलिवूडसह तेलुगू सिनेमांमध्येही काम केलं आहे. सरगम (1979), कामचोर (1982), तोहफा (1984), शराबी (1984), मकसूद (1984), संजोग (1985), आखिरी रास्ता (1986), एलान-ए-जंग (1989) हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे आहेत.