काय म्हणता? ‘थलायवी’साठी कंगना राणौतने घेतल्या हार्मोन्सच्या गोळ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 12:07 PM2019-11-26T12:07:31+5:302019-11-26T12:08:13+5:30

Thalaivi Movie | Jayalalithaa's Biopic : ‘थलायवी’ या बायोपिकबद्दल आणि त्यातील आपल्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल कंगनाने एक मोठा खुलासा केला आहे.

jayalalithaa biopic thalaivi kangana ranaut took mild doses of hormone pills | काय म्हणता? ‘थलायवी’साठी कंगना राणौतने घेतल्या हार्मोन्सच्या गोळ्या!

काय म्हणता? ‘थलायवी’साठी कंगना राणौतने घेतल्या हार्मोन्सच्या गोळ्या!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘थलायवी’ हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत लवकरच ‘थलायवी’ या बायोपिकमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या बायोपिकचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला. मात्र नेटक-यांना कंगनाचा हा लूक फारसा पसंत पडला नाही आणि कंगना सोशल मीडियावर ट्रोल झाली. आता या बायोपिकबद्दल आणि त्यातील आपल्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल कंगनाने एक मोठा खुलासा केला आहे. होय, जयललितांच्या लूकसाठी मी काहीप्रमाणात हार्मोन्स पिल्स घेतल्याचे तिने सांगितले.


‘मिड डे’शी बोलताना तिने हा खुलासा केला. तिने सांगितले की, सिनेमात एखाद्या विशिष्ट व्यक्तिची भूमिका साकारताना कलाकार त्या व्यक्तिची वेशभूषा व दिसण्यानुसार स्वत:त काही बदल करतो. संबंधित व्यक्तिच्या शरीररचनेच्या आधारावर क्वचित बदल केले जातात. पण ‘थलायवी’च्या दिग्दर्शकांना जयललितांच्या लूकनुसार बदल हवे होते. कारण ख-या आयुष्यात जयललिता यांच्यातही प्रचंड बदल झाले होते. एक भरतनाट्यम नृत्यांगणा असल्याने त्यांचे फिजिक कमालीचे सुंदर होते. काही वर्षांनंतर त्या राजकारणात आल्या आणि एका दुर्घटनेने त्यांना विशिष्ट प्रकारचे स्टेरॉईड्स घ्यायला भाग पाडले.

आम्ही हे करू शकत नव्हतो. त्यामुळे माझा लूक बदलण्यासाठी तीन टप्प्यांचा आधार घेण्यात आला. सुरुवातीला जयललिता सडपातळ होत्या. नंतर त्यांचे वजन प्रचंड वाढले. माझा चेहरा व्ही शेपचा आहे आणि जयललितांचा ओ शेपमध्ये होता. हे बदल दाखवण्यासाठी मला फार कमी प्रमाणात हार्मोन्स पिल्स घ्याव्या लागल्या. शिवाय वजन वाढवण्यासाठी डाएट बदलावे लागले.


‘थलायवी’ हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कंगनाने 20 कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचे कळतेय. जयललिता यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली असून तिला प्रोस्थेटिक मेकअपचा आधार घ्यावा लागला होता. या मेकअपचे काही फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 26 जून 2020 रोजी हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: jayalalithaa biopic thalaivi kangana ranaut took mild doses of hormone pills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.